राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे.(changes) सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल होत असतो. ढगाळ वातावरण, दमटपणा आणि ओलाव्यामुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा मोठे मोठे फोड येतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरले जातात. मात्र यामुळे बऱ्याचदा त्वचेचे आणखीन नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा मोठे फोड येणार नाहीत.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर जमा झालेले तेल त्वचेच्या छिद्रांमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे पिंपल्स किंवा फोड येतात. (changes)हे फोड येऊ नये म्हणून सगळ्यात आधी त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. दिवसभरात दोन किंवा तीन वेळा चेहरा फेसवॉश लावून स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होईल. पावसाळ्यात घामामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते. अशावेळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी जेल-बेस्ड सॅलिसिलिक अॅसिड असलेले फेसवॉश वापरावे.
घाईगडबडीमध्ये अनेक महिला चेहऱ्यावर टोनर लावत नाहीत. पण असे न करता नियमित चेहऱ्यावर टोनर लावावे. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. टोनर लावल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि पोर्सही टाइट होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही गुलाबजल किंवा अॅस्ट्रिजेंट टोनरचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ माती निघून जाईल.

त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवणे नियमित मॉइश्चरायजर लावणे गरजेचे आहे. स्किन केअर करताना टोनर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायजर लावावे. यामुळे तेलकट होत नाही. (changes) पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो ऑइल-फ्री मॉइश्चरायजरचा वापर करावा. ज्यांची त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट आहे अशांनी जेल बेस्ट मॉइश्चरायजर लावावे.शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचेवर कोणतेही पिंपल्स किंवा ऍक्ने येत नाही. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. पाणी त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचे सेवन करावे.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय