रोज झडणाऱ्या केसांना हलक्यात घेऊ नका, असू शकतो ‘हा’ गंभीर आजार जो डॉक्टरांनाही टाकेल बुचकळ्यात

जर तुमचे सुद्धा केस रोज झडत असतील तर मग या गोष्टीकडे दुर्लक्ष (alopecia)नाही केले पाहिजे. हे Alopecia सारख्या आजाराचे लक्षण असू शकते, ज्याचा वेळेवर

रोज अनेकांचे केस गळत असतात. ही एक सर्वसामान्य बाब आहे मात्र काही प्रकरणात त्याकडे दुर्लक्ष न केलेले बरे. डॉक्टरांच्या मते, केस गळणे केवळ हवामान किंवा ताणतणावाचा परिणाम नाही(alopecia) तर गंभीर वैद्यकीय स्थिती अलोपेसिया (Alopecia) चे लक्षण असू शकते. अलोपेसिया म्हणजेच जास्त केस गळणे.

वेळेवर ओळखणे आणि उपचार करणे आवश्यक
काही तज्ञांच्या मते, दररोज प्रत्येकाचे काही केस गळतात, परंतु जेव्हा केस वेगाने किंवा पॅचमध्ये गळू लागतात तेव्हा ते चिंतेचा विषय बनतात. जर अलोपेसियावर वेळेवर उपचार केले नाहीत(alopecia) तर ते कायमचे टक्कल पडण्याची शक्यता असते. तज्ञांचे म्हणणे आहे की हार्मोनल असंतुलन, पोषक तत्वांचा अभाव, जळजळ, संबंधित आजार किंवा अलीकडेच झालेला कोणताही गंभीर आजार यासारख्या अनेक कारणांमुळे अलोपेसिया होऊ शकतो.

अलोपेसियामागे ही कारणे असू शकतात
हार्मोनल विकार
थायरॉईड किंवा पीसीओएस सारख्या परिस्थिती शरीरातील हार्मोन पातळीला असंतुलित करतात. विशेषतः महिलांमध्ये, एंड्रोजन हार्मोनचे जास्त प्रमाण केसांच्या मुळांना कमकुवत करते. ज्यामुळे डोक्याच्या मध्यभागी केस पातळ होतात.

ऑटोइम्यून रोग
अलोपेसिया एरियाटा आणि ल्युपस सारख्या आजारांमध्ये, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच केसांच्या मुळांवर हल्ला करू लागते. यामुळे, केस अचानक ठिपक्यांमध्ये गळू लागतात. डोक्यावरून, दाढीवरून किंवा अगदी भुवयांवरून केस गळू लागतात.

गंभीर आजारांनंतर पोषणाचा अभाव आणि परिणाम
कोविड-19 सारख्या महामारीनंतर, लोकांच्या आरोग्यात अनेक बदल दिसून आले आहेत. ज्यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते गळू लागतात. तसेच, प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात.

डॉक्टरकडे कधी जावे?
जर तुमचे केस अचानक गळू लागले तर तुम्ही त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय, जेव्हा डोक्यावर गोल ठिपके दिसू लागतात आणि सामान्य हेअर केअरने सुद्धा काही फरक पडत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी, तुम्ही हार्मोन प्रोफाइल आणि पोषण संबंधित टेस्ट करून घ्याव्यात आणि केसांसाठी योग्य आहार आणि हेअर केअर रुटिंग सुद्धा करून पाहावेत.

हेही वाचा :

‘तो’ एकुलताएक सुपरस्टार, ज्यानं सिल्वर स्क्रिनवर तीन सख्ख्या बहिणींसोबत केला रोमान्स; तिघींसोबतच्या फिल्म्स सुपरहिट
उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महादेवी हत्तीला वनतारामधून परत आणण्याबाबत उच्चस्तरीय बैठक आयोजित
लग्न केलं नाहीस तर आपले फोटो तुझ्या घरी पाठवेन; विद्यार्थिनीने रुमवर आयुष्य संपवलं, मैत्रिणीने फोन केला, प्रतीक्षाताई…