तुमची सुरक्षा नको रे बाबा! असं का म्हणतात शरद पवार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री असताना, केंद्रीय मंत्री असताना(political) ते सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात कधी दिसले नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षक दिसू लागले आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही अगदी जवळून भेटू शकत नाही. त्यांचे एकूण राजकारण हे तिरकस असले तरी त्यांना राजकारणात आणि राजकारणाच्या बाहेर कोणी शत्रू नाहीत.

आज पर्यंत त्यांना पत्राद्वारे, दूरध्वनी वरून, सोशल मीडिया (political)वरून धमकी वगैरे दिली आहे असे कधी घडलेले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आल्याची घोषणा का केली असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात उभा राहिला आहे. तर खुद्द शरद पवार यांनी त्याबद्दल अप्रत्यक्ष शंका उपस्थित केली आहे. तुमची सुरक्षा नको रे बाबा अशा आशयाची त्यांची ही शंका आहे.

शरद पवार हे गर्दीतले नेते. त्यांच्याभोवती सतत कार्यकर्त्यांचा गोतावळा असतो. कार्यकर्त्यांना नावानिशी हाक मारणारे नेते म्हणून त्यांची राजकारणात खासियत आहे. मुख्यमंत्री असताना किंवा केंद्रात मंत्री असताना त्यांना सुरक्षा व्यवस्था होती पण ती त्यांच्याभोवती कडे करून आहे असे चित्र कधी दिसले नाही. सध्या मात्र त्यांच्याभोवती सुरक्षा कवच असते. विशिष्ट ड्रेस कोड मधील सुरक्षा रक्षक त्यांच्याभोवती असतात. त्यामुळे अगदी सहजपणे त्यांच्याजवळ कुणाला जाता येत नाही. असे असताना केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना सी आर पी एफ चे 55 जवान सुरक्षिततेसाठी तैनात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

झेड प्लस सिक्युरिटी देण्यामागचे नेमके कारण(political) कळत नाही. कारण शरद पवार यांच्या जीविकास धोका आहे अशी परिस्थिती नाही आणि नव्हती. म्हणूनच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या निर्णयाने सामान्य माणूस चकित झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे काही अधिकारी शरद पवार यांना त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेटले.

त्यांच्याशी सुरक्षा विषयक चर्चा केली. पण अगदी प्रथम दर्शनी त्यांनी केंद्र शासनाची झेड प्लस सिक्युरिटी नाकारली. त्यानंतर ही सुरक्षा स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या समोर काही अटी ठेवल्या आहेत. सुरक्षा पथकातील जवान, हे निवासस्थानाच्या आत मध्ये असता कामा नयेत. सुरक्षा अधिकारी माझ्या खाजगी वाहनांमध्ये असू नयेत. सुरक्षा यंत्रणेच्या वाहनातून मी दौरा करणार नाही ,प्रवास करणार नाही, अशा काही अटी त्यांनी समोर ठेवल्या आहेत.

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना राज्यभर प्रचार दौरे करावे लागणार आहेत. अनेक जाहीर सभा घ्याव्या लागणार आहेत. रोड शो करावा लागणार आहे, महा विकास आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे.. झेड प्लस सिक्युरिटी असेल तर प्रचार दौरे ,प्रचार सभा, यावर प्रतिकूल परिणाम होतो. कार्यकर्त्यांना सहजपणे भेटता येत नाही. सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत जाता येत नाही. हालचालीवर बंधने येतात. आणि अगदी तसेच घडावे याच हेतूने केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सिक्युरिटी दिली असल्याचा संशय शरद पवार यांच्या मनामध्ये आहे. सुरक्षा व्यवस्थेमधील अधिकारी निवासस्थानी सुद्धा असतील तर प्रायव्हसी मिळणार नाही.

राजकीय खलबते करता येणार नाहीत. एक प्रकारची अडचणच होणार आहे आणि म्हणूनच शरद पवार यांनी झेड प्लस सिक्युरिटी नाकारली आहे. किंवा ही सुरक्षा यंत्रणा स्वीकारताना त्यांनी काही अटी ठेवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीचा एक भाग म्हणून, राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांनी ही सुरक्षा व्यवस्था देऊ केली असावी असा किंतु शरद पवार यांच्या मनामध्ये असणे स्वाभाविक आहे.

हेही वाचा:

लाडकी बहीण योजना बंद होणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य

‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

महाविकास आघाडीचे जोडो मारो आंदोलन सुरु, पवार-ठाकरेंसह कार्यकर्ते रस्त्यावर