डीपीएलचा लिलावाची तारीख ठरली; फ्रँचायझींना मिळाले १.५ कोटी रुपयांचे पर्स 

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने दिल्ली प्रीमियर लीगच्या हंगाम २(delhi) साठी खेळाडूंच्या लिलावाचे नियम आणि रचना अधिकृतपणे जाहीर केली आहे. डीपीएलचा लिलाव ६ जुलै रोजी दिल्लीमध्ये (पुरुष) आणि ७ जुलै रोजी (महिला) होणार आहे.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) ने दिल्ली प्रीमियर(delhi) लीग (डीपीएल टी२०) च्या सीझन-२ साठी खेळाडूंच्या लिलावाचे नियम आणि रचना अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली प्रीमियर लीगचा लिलाव ६ जुलै रोजी दिल्लीमध्ये (पुरुष) आणि ७ जुलै रोजी (महिला) होणार आहे, ज्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोडवर दाखवले जाणार आहे. यावेळी हा हंगाम पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक आणि भव्य पद्धतीने आयोजित केला जाणार आहे.

एक ऐतिहासिक पाऊल टाकत डीडीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, लिलावात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा असणार नाही. याचा अर्थ (delhi) असा आहे की १६ वर्षांखालील खेळाडूंपासून ते अनुभवी खेळाडूंपर्यंत सर्वांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची समान संधी मिळणार आहे. भविष्यातील क्रिकेट स्टार बाहेर आणण्याच्या आणि सर्व वर्गातील खेळाडूंना समान रीतीने सामावून घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

फ्रँचायझींना मिळणार १.५ कोटी रुपयांचे पर्स
यावेळी डीडीसीएकडून डीपीएल टी२० लीगमध्ये ८ संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या हंगामात या लीगमध्ये ६ संघ होते पण या हंगामात आणखी दोन संघांचा समावेश केला गेला आहे. सर्व संघांच्या फ्रँचायझींना १.५ कोटी रुपयांची पर्स देण्यात आली आहे. या हंगामात लिलाव प्रक्रियेत बदल करण्यात आला सन काही नवीन नियम आणण्यात आले आहेत. लिलावाचे संपूर्ण नियम पुढील प्रमाणे असणार आहेत.

खेळाडूंना या श्रेणींमध्ये विभाजन
मार्की सेट – भारताचे प्रतिनिधित्व करणारे किंवा आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू (१९ खेळाडू)
श्रेणी अ – माजी आयपीएल (डीडीसीएकडे नोंदणीकृत) आणि प्रथम श्रेणी डीडीसीए खेळाडू (३५ खेळाडू)
श्रेणी ब – डीडीसीए अंडर-२३, अंडर-१९ आणि अंडर-१६ खेळाडू (१०५ खेळाडू)
श्रेणी क – प्रादेशिक लीग खेळाडू (३६१ खेळाडू)
असे असतील खेळाडू राखण्याचे नियम
प्रत्येक फ्रँचायझी एका खेळाडूला कायम ठेवू शकणार आहे. फ्रँचायझी कोणत्याही श्रेणीतील खेळाडू राखते, खेळाडूच्या श्रेणीनुसार त्याच्या लिलाव पर्समधून वजावट केली जणारया आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या संघाने मार्की खेळाडू राखला असेल तर २१ लाख रुपये वजा करण्यात येतील. तर अ श्रेणीतील खेळाडूंसाठी १० लाख, ब श्रेणीतील खेळाडूंसाठी ४.५ लाख आणि क श्रेणीतील खेळाडूंसाठी १.५ लाख रुपये वजा करण्यात येणार आहेत.

देशातील काही सर्वात लोकप्रिय आणि प्रतिभावान क्रिकेटपटू देखील या लिलावात सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. पुरुष खेळाडूंच्या यादीमध्ये ऋषभ पंत, इशांत शर्मा, आयुष बदोनी, हर्षित राणा, मयंक यादव, सुयश शर्मा, अनुज रावत सारखे अनेक आयपीएल खेळाडू असणार आहेत, जे डीपीएलला एका नवीन स्तरावर घेऊन जाण्यास मदत करतील.

हेही वाचा :

भारतातील ‘या’ राज्यावर 6 जुलैला विनाशकारी संकट? नागरिकांकडे वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा सज्ज; तब्बल 8 हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार

Volkswagen Cars वर छप्परफाड डिस्काउंट, तब्बल 2.5 लाखांची सूट