आजच्या धावपळीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेक महिलांना (mental)मानसिक ताण, नैराश्य, चिंता, नकारात्मक विचार आणि झोप न येण्याच्या तक्रारी वाढत आहेत. घर, करिअर, मुलांची जबाबदारी, कुटुंबीयांच्या अपेक्षा यामुळे मेंदूला सतत ताणाचा सामना करावा लागतो. ही लक्षणं पुढे नैराश्यात बदलू शकतात. यावर उपाय आहे तो म्हणजे योग, प्राणायाम, ध्यान आणि शिस्तबद्ध दिनचर्या.

प्रभावी योगासने :
शशांकासन : हा आसन तणाव कमी करतो, (mental) मेंदूला शांती मिळते.
सेतुबंधासन : मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, डिप्रेशन कमी होते.
विपरीत करणी आसन : रक्तप्रवाह मेंदूकडे वाढतो, थकवा व चिंता कमी होते.
पवनमुक्तासन : पचन सुधारतो आणि झोपेस मदत होते.
सुप्त बद्धकोणासन : शरीर आणि मन शांत करण्यासाठी उपयुक्त.
शवासन : शरीर व मन पूर्णपणे रिलॅक्स करतो, झोप येण्यासाठी उत्तम.
झोपेसाठी विशेष प्राणायाम :
अनुलोम विलोम प्राणायाम : मन शांत होऊन (mental)झोपेची गुणवत्ता सुधारते.
भ्रामरी प्राणायाम : डोकं शांत होतं, चिंता कमी होतात, झोप पटकन लागते.
शीतली व शीतकारी प्राणायाम : मेंदूला थंडावा मिळतो, तणाव कमी होतो.
नाडी शुद्धी प्राणायाम : झोपेसाठी संतुलन साधणारा प्राणायाम.
ध्यान आणि मंत्र :
दररोज रात्री झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटे ध्यान करावे.
‘ॐ’ जप किंवा शांती मंत्र उच्चारल्याने मन शुद्ध होतं.
गायडेट मेडिटेशन, सॉफ्ट म्युझिक किंवा योगनिद्रा यांचा उपयोग करू शकता.
झोपेसाठी योग्य दिनचर्या
रोज ठरावीक वेळी झोपणं व उठणं.
झोपण्याच्या १ तास आधी मोबाईल, टीव्ही, स्क्रीन टाळा.
झोपण्यापूर्वी कोमट पाणी किंवा दूध घ्या.
दिवसभर ३० मिनिटं सूर्यप्रकाशात फिरा, व्हिटॅमिन D झोपेसाठी आवश्यक आहे.
संध्याकाळी किंवा रात्री ‘गोल्डन मिल्क’ पिणं फायदेशीर.
झोपण्याच्या आधी पायांना खोबरेल किंवा बदाम तेल लावून मसाज करा.
हलकं संगीत किंवा सुगंधी दीप/अगरबत्ती लावल्यानेही शांत झोपेस मदत होते.
आहारात काय टाळावं?
कॅफिन संध्याकाळी टाळावं.
रात्री जड व तळलेलं अन्न खाणं टाळावं.
गोडाचं प्रमाण कमी करावं.साखर, पेस्ट्री, चॉकलेट्स यामुळेही झोपेवर परिणाम होतो.
हे लक्षात घ्या :
३० मिनिटं योगासनं + १५ मिनिटं प्राणायाम + १० मिनिटं ध्यान रोज केल्याने शरीर-मनाचं संतुलन साधतं. हे सर्व सकाळी किंवा संध्याकाळीही करू शकता. झोपण्यापूर्वी शवासन, भ्रामरी आणि थोडं ध्यान केल्यास झोपेचा त्रास लवकर कमी होतो.
तणाव, झोपेचा त्रास आणि नैराश्य यावर गोळ्या किंवा सल्ला घेण्याआधी स्वतःसाठी वेळ द्या. मनाची शुद्धी, शांतीसाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे. स्क्रीनपासून दूर राहणं, नैसर्गिक पद्धतीने झोपेसाठी प्रयत्न करणं आणि प्राणायाम-ध्यान करणं याला पर्याय नाही.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती
मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करा, राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी…