कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पहिल्या(durangi) टप्प्यातील मतदानही पार पडले आहे. त्यातच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारीचा दिवस काल पूर्ण झाला. या दिवसात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने राजकीय लढत स्पष्ट झाली. कोल्हापुरातून चौघांनी, तर हातकणंगलेतून पाच जणांनी माघार घेतली.
कोल्हापूर मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात(durangi) आहेत. येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आपली बंडखोरी कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
कोल्हापूर मतदारसंघातून माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, तर खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक, रूपा वायदंडे आणि राहुल लाड यांनी माघार घेतली. दलित महासंघाच्या रूपा वायदंडे यांनी माघार घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला. तर हातकणंगले मतदारसंघात अपक्ष उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने (सेम नावाचा व्यक्ती आहे) वेदांतिका धैर्यशील माने, बाबासाहेब यशवंत पाटील, शिवाजी विठ्ठल माने आणि सुनील विलास अपराध यांनी माघार घेतली.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/04/image-735.png)
कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आणि चिन्ह
- श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (काँग्रेस-हाताचा पंजा)
- संजय मंडलिक (शिवसेना-धनुष्यबाण)
- संजय मागाडे (हत्ती)
- संदीप कोगले (बॅट)
- बसगोंडा पाटील (भेटवस्तू)
- अरविंद माने (कॅरमबोर्ड)
- शशीभूषण देसाई (रोड रोलर)
- सुनील पाटील (गॅस सिलिंडर)
- संतोष बिसुरे (सीसीटीव्ही कॅमेरा)
- इरफान चांद (हिरवी मिरची)
- कुदरतुल्ला लतीफ (शिवणयंत्र)
- कृष्णा देसाई (हिरा)
- बाजीराव खाडे (ऊस शेतकरी)
- नागनाथ बेनके (शिट्टी)
- माधुरी जाधव (प्रेशर कुकर)
- मुश्ताक मुल्ला (दूरदर्शन)
- मंगेश पाटील (इस्त्री)
- ॲड. यश हेगडे-पाटील (कोट)
- राजेंद्र कोळी (किटली)
- सलीम बागवान (अंगठी)
- सुभाष देसाई (लिफाफा)
- संदीप संकपाळ (बॅटरी टॉर्च)
हातकणंगले मतदारसंघातून 27 उमेदवार रिंगणात(durangi) आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetti आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे डी. सी. पाटील D. C. Patil यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.
याशिवाय भारत जवान किसान पक्षाचे रघुनाथदादा पाटीलही रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात उमेदवारांची निश्चिती झाल्याने आता प्रचारात रंगत येणार आहे. आतापर्यंत धूसर असणारे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, प्रमुख उमेदवारांवरून निवडणुकीतील लढत निश्चित झाली आहे.
हातकणंगले लोकसभेचे उमेदवार व चिन्ह
- रवींद्र कांबळे (हत्ती)
- धैर्यशील माने (शिवसेना-धनुष्यबाण)
- सत्यजित पाटील आबा सरुडकर (शिवसेना ठाकरे गट- मशाल)
- राजू शेट्टी (शिट्टी)
- डी. सी. पाटील (वंचित – प्रेशर कुकर)
- इम्रान खतीब (खाट)
- डॉ. ईश्वर यमगर (ट्रिलर)
- दिनकरराव चव्हाण (सिंह)
- धनाजी गुरव (रिक्षा)
- रघुनाथदादा पाटील (भेटवस्तू)
- शरद पाटील (गॅस सिलिंडर)
- संतोष खोत (नारळाची बाग)
- अस्लम मुल्ला (चिमणी)
- आनंदराव सरनाईक (बॅटरी टॉर्च)
- जावेद मुजावर (फुगा)
- लक्ष्मण डवरी (अंगठी)
- लक्ष्मण तांदळे (हिरा)
- परशुराम माने (सफरचंद)
- मनोहर सातपुते (स्पॅनर)
- महंमद दरवेशी (एअर कंडिशनर)
- अरविंद माने (कॅरम बोर्ड)
- देवेंद्र मोहिते (ट्रक)
- राजेंद्र माने (दूरदर्शन)
- रामचंद्र साळुंखे (कपाट)
- शिवाजी संकपाळ (बॅट)
- सत्यजित पाटील(माईक)
- आनंदराव थोरात (किटली)
हेही वाचा :
निवडणूक प्रचाराचे तंत्र कालचे आणि आजचे
पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !
भले, आम्ही असो एकत्र! जाहीरनामा आमुचा वेगळा!