शिराळा पुन्हा राजू शेट्टींना भरभक्कम साथ देणार का?; ‘स्वाभिमानी’वरच सर्व भिस्त

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी(hpsupport) लढत होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील, विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील या चौघे खासदारकीसाठी एकमेकांशी लढणार आहेत. पण, खरी कसोटी ही राजू शेट्टी, धैर्यशील माने आणि शिवसेनेचे सत्यजित पाटील यांची लागणार आहे.

हातकणंगले लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत(hpsupport) धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये थेट लढत झाली होती. त्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना शिराळा मतदारसंघातून ९८ हजार ४६४, तर माने यांना ७७ हजार ४२२ मते मिळाली होती. यंदा सत्यजित पाटील हे शाहूवाडीमधील उमेदवार असल्याने यंदा मतविभागणीचा फटका बसू शकतो. मात्र, तो कोणाला बसणार, याची उत्सुकता आहे. मात्र, मताधिक्यासाठी तीनही उमेदवारांना पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राजू शेट्टी विरोधात काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे उभे होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी मानसिंगराव नाईक, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी आघाडी धर्म पाळून काँग्रेसच्या आवाडे यांचा प्रचार केला होता. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला हेाता. त्यामुळे राजू शेट्टी यांना १ लाख ०१ हजार ७३९ मते मिळाली होती, तर आवाडे यांना ८२ हजार ३०५ मते मिळाली होती.

पुढे २०१९ च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांना धैर्यशील माने यांनी आव्हान दिले हाेते. मात्र, शिराळ्यातून पुन्हा राजू शेट्टी यांना ९८ हजार ४६४, तर माने यांना ७७ हजार ४२२ मते मिळाली होती. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी धैर्यशील माने यांना मदत केली होती. राजू शेट्टींच्या पाठीशी मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख हे उभे होते.

यंदाच्या निवडणुकीत विरोधक मित्र आणि मित्र शत्रू झाले आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारात महायुतीचे सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे उरले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांची ताकद असणार आहे. राजू शेट्टी यांना या वेळी कोणत्याही पक्षाची अथवा संघटनेची साथ नाही, त्यामुळे शेट्टींची भिस्त या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरच असणार आहे.

हेही वाचा :

निवडणूक प्रचाराचे तंत्र कालचे आणि आजचे

कोल्हापुरात दुरंगी, तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात

पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !