मुंबई : महाराष्ट्रात नवीन सरकार(Political news) स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावाही सोडला आहे. महायुतीत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाची किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाचीही ऑफर देण्यात आली आहे.
ऑफरही देण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची(Political news) ऑफरही देण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफरही नाकारल्याची माहिती आहे. पण एकनाथ शिंदे यांनी महायुतीसोबत राहूनच एकीचा संदेश देण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भाजपच्या नेत्यांची मागणी आहे.
एकनाथ शिंदे सुरुवातीला उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते. नंतर त्यांनी मवाळ भूमिका घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांनी थेट गृहखाते आणि नगरविकास खात्याचीही मागणी केली. आज संध्याकाळी मुंबईत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार होती. पण ती बैठकही रद्द करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय तज्ज्ञांच्या मते, निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी केली होती. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. त्यामुळे महायुतीत एकजुटता दिसावी, आणि हा एकजुटीचा संदेश द्यावा, यासाठी शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांच्या आदेश आपल्याला मान्य असल्याचेही म्हटले आहे.
या महत्त्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीच्या लोकांनी कोणताही नवा वाद निर्माण करू नये, अशी भाजपचीही इच्छा असल्याने शिंदे यांना त्यांच्या संमतीचा संदर्भ देऊन उपमुख्यमंत्री करण्यावर पूर्ण भर दिला जात आहे. इतकेच नव्हे तर, शिंदे हे खऱ्या भावासारखे राहिले तर भाजपला अजित पवारांकडे वारंवार पाहण्याची गरज भासणार नाही.
एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर असल्याच्याही चर्चा होत्या. पण त्यांनी केंद्रात जाऊ नये. असा आग्रह शिदे गटाच्या नेत्यांकडून कऱण्यात येत आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा अनुभव पाहता त्यांनी केंद्रात न जाता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय राहावे, अशी प्रतिक्रीया आमदार शंभुराज देसाई यांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाऊ नये, पण महाराष्ट्रात त्यांनी कोणतं पद स्वीकारावं किंवा स्वीकारू नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. याबाबत त्यांनी स्वत:च निर्णय घ्यायचा आहे.
याशिवाय राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात महिला आमदारांनाही मोठी संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. चार महिला आमदारांची वर्णी लागू शकते, यात अजित पवार गटाच्या 4, शिंदे गटाच्या 2 महिला आमदार सध्या विधानसभेत आहेत. तर 2 टर्मपेक्षा अधिक काळ निवडून येणाऱ्या महिला आमदारांनाहीमंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने संबंधित महिला आमदारांच्या सर्व प्रोफाईल्स दिल्लीतील केंद्रीय नेतृत्त्वाने मागवल्याची माहिती आहे.
हेही वाचा :
महायुतीत मोठ्या घडामोडी! महायुतीची बैठक अचानक रद्द, एकनाथ शिंदे मूळगावी जाणार
लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून शाळेतील 3 चिमुकलींची छेडछाड ; बदलापूर घटनेची पुनरावृत्ती
रेश्मा शिंदे करतेय ‘आयुष्याची नवी सुरुवात’; अखेर दिसला वरचा चेहरा लग्न सभारंभाचे फोटो व्हायरल!