एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) आज एक नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. आजपासून राज्यात नवीन युती बघयला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी केल्ली खेळली आहे. रिपब्लिकन सेनेसोबत युती केली. एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केली आहे.

डॉ. आनंदराज आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी राज्यात युतीचे नवीन समीकरण तयार केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती त्यांनी घडवून आणली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्रिपटणे लढणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय(politics) स्वरूपाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही दोघे कार्यकर्ते एकत्रित आलो आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तळागाळात जाऊन व्यक्तीपर्यंत पोचून त्यांच्या सुख दुःखात एकरूप होण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी कार्यकर्ता हा शब्द वापरला. देशातील आणि राज्यातील आंबेडकरी समाज हा अनेक वर्षे रस्त्यावरील लढाई लढत आला. मात्र त्या कार्यकर्त्याला काही मिळाल नाही. आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा म्ह्णून आम्ही एकत्रित आलो आहोत.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना गुडन्यूज! राज्यात आता कृषी समृद्धी योजना सुरू

आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात माठी घसरण, चांदीचे भाव स्थिर!

अरे देवा! पुन्हा एकदा डाऊन झाला OpenAI चा चॅटबोट, हजारो युजर्स वैतागले!