इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यातून 2 खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.(test) त्यानंतर आता सामन्यादरम्यान आणखी एका खेळाडूला दुखापत झाली आहे.
तीव्र आणि असह्य वेदना, स्टार खेळाडूला सामन्यादरम्यान दुखापत, थेट मैदानाबाहेर, टीमला टेन्शन

इंग्लंड विरुद्ध भारत या कसोटी मालिकेतून आतापर्यंत अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.(test) आकाश दीप आणि अर्शदीप सिंह या दोघांना दुखापतीमुळे चौथ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं होतं. तर नितीश कुमार रेड्डी याला मालिकेला मुकावं लागलं. तसेच भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स या दोघांना दुखापतीमुळे पाचव्या आणि अंतिम सामन्याला दुखापतीमुळे मुकावं लागलं. त्यानंतर आता पाचव्या सामन्यादरम्यान एका खेळाडूला दुखापत झाली. त्यामुळे या खेळाडूला मैदानाबेहर जावं लागलं.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम कसोटी(test) सामना हा लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याला जबर दुखापत झाली. वोक्सला तिसऱ्या आणि अंतिम सत्रात ही दुखापत झाली. वोक्सला चौकार रोखण्याच्या प्रयत्नात ही दुखापत झाली. त्यामुळे वोक्सला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. वोक्सच्या दुखापतीमुळे इंग्लंडचं टेन्शन वाढलंय.
नक्की काय झालं?
भारताकडून करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी मैदानात होती. इंग्लंडकडून जेमी ओव्हरटन भारताच्या डावातील 57 वी ओव्हर टाकत होता. जेमीने टाकलेल्या पाचव्या बॉलवर करुण नायर याने जोरदार फटका मारला. करुणने मारलेला फटका रोखण्यासाठी वोक्स मिड ऑफच्या दिशेने वेगात धावत गेला. ख्रिसने डाईव्ह मारुन बॉल अडवला. मात्र वोक्सला या प्रयत्नात दुखापत झाली. वोक्स या प्रयत्नात सीमारेषेच्या पलीकडे गेला. वोक्सला तीव्र वेदना झाल्या. वोक्स हात धरुन बसला. वोक्सला वेदनेत पाहताच फिजिओने मैदानात धाव घेतली. त्यानंतर फिजिओने वोक्सला मैदानाबाहेर नेलं.
तर दुसऱ्या बाजूला करुण आणि सुंदर या दोघांनी वोक्सने बॉल थांबवण्याआधी 3 धावा घेतल्या. मात्र करुणने वोक्सची स्थिती पाहून चौथी धाव न घेण्याचा निर्णय केला आणि खिलाडूवृत्ती दाखवली. अशाप्रकारे इंग्लंडला फक्त 1 धावेचा फायदा झाला. मात्र इंग्लंडला ही 1 धाव चांगलीच महागात पडली.
वोक्सच्या खांद्याला दुखापत
वोक्सला झालेली दुखापत किती गंभीर आहे? याची माहिती नाही. मात्र वोक्सच्या चेहऱ्यावरील हावभावामुळे चाहत्यांची चिंता वाढलीय. वोक्स इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. वोक्स बॉलिंग आणि बॅटिंग अशी दुहेरी भूमिका बजावतो. वोक्सला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं तर इंग्लंडसाठी हा मोठा झटका असेल. वोक्सने या सामन्यात आतापर्यंत 14 ओव्हर बॉलिंग करत 1 विकेट घेतली आहे.
टीम इंडिया 200 पार
दरम्यान टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली आहे. करुण 52 तर सुंदर 19 रन्सवर नॉट आऊट आहे.
हेही वाचा :
अमेरिकेचा भारताला आणखी एक मोठा झटका…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद यशस्वी
सरकारी शाळेत शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! 7 हजार 466 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?