ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या(England) पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेट गमावून 204 धावा केल्या आहेत. ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या भारत आणि इंग्लंडच्या पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेर भारताने 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या आहेत.खेळ थांबेपर्यंत करुण नायर 52 धावांवर खेळत आहे, तर वॉशिंग्टन सुंदर 19 धावा करून अजूनही मैदानावर आहे. दरम्यान, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज क्रिस वोक्सला दुखापत झाली आहे.

ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने (England)प्रथम गोलंदाजी केली. यावेळी क्रिस वोक्सने भेदक गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. क्रिस वोक्सने चांगल्या फॉर्मात असलेल्या केएल राहुलला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. मात्र पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याआधी क्रिस वोक्सला दुखापत झाली.
भारतीय डावाच्या 57 व्या षटकात जेमी ओव्हरटन गोलंदाजी करत होता. यावेळी करुण नायरने टोलावलेला चेंडू रोखताना क्रिस वोक्सला दुखापत झाली. यानंतर क्रिस वोक्सला मैदान सोडून बाहेर जावे लागले.
चेंडू अडवताना वोक्सला दुखापत झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेटच्या वैद्यकीय पथकाने ताबडतोब मैदान गाठले आणि त्याची तपासणी सुरू केली. परंतु वोक्स मैदानावर राहू शकत नव्हता हे स्पष्ट झाले. वैद्यकीय पथकाच्या मदतीने तो मैदानाबाहेर गेला आणि पुन्हा परतलाच नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याच्या दुखापतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही, परंतु वोक्सची प्रकृती पाहता, या सामन्यात त्याला पुढे गोलंदाजी करणे कठीण झाले आहे हे स्पष्ट दिसून येत आहे.
हेही वाचा :
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी
महादेवी हत्तीणीसाठी नांदणी ते कोल्हापूरआत्मक्लेश मूक मोर्चा