दक्षिण मुंबईत नवमतदारांचा उत्साह पण मतदान सरासरी 47.70 टक्केच

दक्षिण मुंबई(south mumbai) मतदार संघात सोमवारी सेलिब्रेटी ते सर्वसामान्य नागरिक मतदारांनी मतदान केले. उन्हामुळे सायंकाळनंतर मतदान केंद्रात गर्दी वाढत होती. वृद्ध मतदार याना मतदान केंद्रात नेण्यासाठी पोलीस मदत करत होते. पहिल्यांदा मतदान करणाऱया नव मतदाराचा उत्साहच वेगळा होता. नव मतदार हे मतदान केंद्राबाहेर सेल्फी काढत होते पण दक्षिण मुंबईत सरासरी 47.70 टक्केच मतदान झाले.

उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून काही मतदारांनी सकाळीच मतदान करून आपले कर्तव्य बजावले. दक्षिण मुंबईतील(south mumbai) काही मतदान केंद्रात पंख्याची सुविधा नसल्याने मतदान केंद्रात कर्तव्यास असलेले कर्मचारी उकाडयाने त्रस्त झाले होते. तसेच काही ठिकाणी मतदार यादी या अपडेटच झाल्या नसल्याचे चित्र होते. एकाच पुटुंबातील सदस्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रात नाव असल्याने नाराजीचा सूर उमटत होता.

यंदाची निवडणूक ही निष्ठावंताची असल्याने महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते हे प्रचंड मेहनत घेत होते. गल्लोगल्ली जाऊन महाविकास आघाडीचे कायकर्ते हे मतदारांना मतदान करण्यासाठी विनंती करत होते. जे पूर्वीचे मतदार काही कारणास्तव तेथून तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत, अशा मतदारांना पह्न करून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बोलावले जात होते. स्थलांतरित झालेल्या मतदाराचा वारंवार फॉलोअप घेतला जात होता. ते मतदार आल्यावर त्याची खुशाली विचारून जुन्या आठवणींना उजाळा देत होते.
शिवडी, लालबाग,लोअर परळ, आग्रीपाडा, मदनपुरा, वरळी, मुंबादेवी, नागपाडा, माझगाव ताडवाडी, मलबार हिल, गिरगाव, पुलाबा, पेडर रोड, डोंगरी, भायखळा, ताडदेव, येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विभागात बूथ लावले होते. त्या बूथवर व्होटिंग स्लिप आणि मतदान केंद्राचा पत्ता जाऊन घेण्यासाठी मतदारांची गर्दी होत होती.

काही मतदान केंद्रात गती कमी असल्याच्या तक्रारी मतदारांच्या होत्या. उह्यामुळे दुपारी 12 ते 4 या वेळात काही मतदान केंद्रात तुरळक गर्दी होती. सायंकाळी उन्ह कमी झाल्यानंतर मतदार हे मतदानासाठी खाली उतरत होते. रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांच्यासह काही उद्योजकांनी सकाळीच जाऊन मतदान केले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी हे पुटुंबियांसोबत मतदानासाठी गेले होते. यंदा नवमतदार याचा जोश वेगळाच पाहण्यास मिळत होता. पाहिल्यादाच मतदान करणार असल्याने ते मतदार प्रचंड खुश होते. मतदान केंद्रात मत केल्यानंतर बाहेर असलेल्या सेल्फी स्टॅन्डवर सेल्फी घेत होते. मतदान केलेला पह्टो ते नवीन मतदार हे त्याच्या व्हाट्स अपच्या स्टेट्सला ठेवत होते.

हेही वाचा :

चांगला मान्सूनचा अंदाज असूनही कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत?

इचलकरंजी तारदाळ मध्ये रेशन दुकानातील धान्यात अळ्या; ग्राहकातून संताप

बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष