‘राहुल गांधी हे मुस्लीम आहेत की ख्रिश्चन हे त्यांनाही माहिती नाही’; भाजपा आमदाराचं विधान चर्चेत

कर्नाटक : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे(political news todays)नेते राहुल गांधी हे सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांच्या अमेरिकेचा दौरा देखील खूप गाजला. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्दे आणि समस्या मांडल्या. यावरुन भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप देखील झाले. राहुल गांधी यांच्याकडून जातीय जनगणनेची मागणी केली जात आहे. यावर देखील भाजप नेत्यांकडून जातीय राजकारण करत असून भेदभाव करत असल्याची टीका केली जात आहे. मात्र ही टीका करताना एका भाजप आमदाराने खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकच्या बीजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे(political news todays) आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी राहुल गांधींच्या जातीबाबत विधान केलं आहे. तसेच राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता रोष व्यक्त करण्यात येत असून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. जात जणगनणेची मागणी करणाऱ्या राहुल गांधींना ते मुस्लीम आहे की ख्रिश्चन हेच माहिती नाही, असे बसंगौडा पाटील यतनाल म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना बसंगौडा पाटील यतनाल यांनी वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की, “राहुल गांधी अमेरिकेत जातात आणि देशविरोधी विधानं करतात. तर भारतात असताना ते जातीजनगणनेची मागणी करतात. मात्र, त्यांचा जन्म कोणत्या जातीत झाला, हे कुणालाही माहिती नाही. आपण मुस्लीम आहेत की ख्रिश्चन, हे स्वत: राहुल गांधी यांनाही माहिती नसेल, त्यामुळे राहुल गांधी यांची वंशावळ तपासावी”, असे विधान करत बसंगौडा पाटील यतनाल यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

पुढे ते म्हणाले की, “राहुल गांधी हे आपण ब्राह्मण असल्याचे सांगतात पण ते कोणते ब्राह्मण आहे? आणि ते ब्राह्मण असतील, तर ते जानवं घालतात का? हे आधी त्यांनी सांगावं”, असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच “राहुल गांधी हे देशी कट्ट्यासारखे आहेत. ते कधीच यशस्वी होऊ शकत नाही”, असा खोचक टोला कर्नाटकच्या बीजापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बसंगौडा पाटील यतनाल यांनी लगावला आहे.

हेही वाचा:

अखेर अनन्याकडून आदित्य राॅय कपूरसोबतच्या ब्रेकअपबद्दल खुलासा!

“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ