क्षणात सगळं संपलं! घराबाहेर खेळत असलेल्या चिमुकल्याला ऑटोने चिरडलं विडिओ viral

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे,(playing) जिथे केवळ दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना इतकी वेदनादायक आहे की ती ऐकून किंवा पाहून कुणाच्याही काळजाला चटका लागेल. चिमुकला आपल्या घरासमोर निरागसपणे खेळत असताना त्या परिसरातून वळण घेत असलेल्या ऑटोने त्याला चिरडले आणि तो जागीच ठार झाला. या अपघाताचा संपूर्ण व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही तो झपाट्याने व्हायरल होत आहे.

ही दुर्दैवी घटना सिवनी जिल्ह्यातील एका रहिवासी भागात घडली.(playing) अपघाताच्या वेळी लहान मुलगा आपल्या घराच्या अगदी बाहेर खेळत होता. आई-बाबा घरातच होते. काही क्षणांतच त्यांच्या आयुष्याचा आधार हिरावला जाईल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.मुलगा खेळत असतानाच गल्लीच्या एका टोकावरून एक ऑटो येत होता. तो वळणावर आला आणि अचानक वळण घेताना ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने थेट चिमुकल्याला धडक दिली आणि त्याच्या अंगावरून ऑटो गेलं. हे दृश्य इतकं भयावह होतं की आजूबाजूचे लोक क्षणभर हादरून गेले. मुलाचा जागीच मृत्यू झाला. चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेचा व्हिडीओ जवळच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. (playing)त्यामध्ये लहान मुलगा एकटाच खेळताना दिसतो आणि काही क्षणांतच ऑटो येऊन त्याला चिरडतो. चालक थांबत नाही आणि गाडी चालवत निघून जातो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!

Honor चा नवीन दमदार 5G Smartphone भारतात लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरी… किंमत तुमच्या बजेटमध्ये