व्यायाम करा अन् चांगलं खा

प्रत्येक मनुष्याला एक चांगली देणगी मिळाली आहे ती म्हणजे सुंदर (beautiful)शरीर. त्या शरीराची आपण जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढा उपयोग आपल्याला आयुष्यभर होत असतो.


प्रत्येक मनुष्याला एक चांगली देणगी मिळाली आहे ती म्हणजे सुंदर (beautiful)शरीर. त्या शरीराची आपण जेवढी जास्तीत जास्त काळजी घेऊ, तेवढा उपयोग आपल्याला आयुष्यभर होत असतो. सात्त्विक आणि वेळेत आहार, दररोज न चुकता व्यायाम करणं आणि वेळेवर सहा ते आठ तास झोप घेतल्यामुळे आपलं शरीर आणि मन तंदुरुस्त राहतं.

मी नियमितपणे सकाळीच उठते. त्यानंतर कमीत कमी एक लिटर पाणी पिते. फ्रेश झाल्यानंतर सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायामाचे प्रकार करते. माझा नाश्ता भरपेट असतो. सकाळचं जेवण हलकंसं असतं. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध होणारी फळं खाते. मी दररोज पाच ते सात लिटर पाणी पिते. प्रत्येक फळामध्ये वेगवगळी जीवनसत्त्वं असतात. दररोज सकाळी मी एक सफरचंद खाते. त्यामुळे मला दिवसभर ऊर्जा मिळते.
वर्कआऊट करण्यापूर्वी मी केळी खाते. त्यात खूप कॅलरीज असतात. त्यामुळे मी चांगल्या प्रकारे वर्कआउट करू शकते. संत्री आणि अननस वर्कआऊट झाल्यानंतर खाते. सायंकाळी लेमन ग्रीन टी पिते आणि द्राक्षं खाते. रात्रीच्या जेवणात चिकन वा पालेभाज्यांचा समावेश असतो. मी सॅलडही भरपूर खाते. त्याचप्रमाणे वेळेवर आणि पुरेशी झोप घेते.

फिट राहिल्यामुळे मला आनंद मिळतो आणि मनःशांतीसाठी मी मेडिटेशन करते. योगासनं, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार माझा मानसिक विकास करण्यासाठी उपयोगी पडतात.

गेल्या दोन वर्षांत मला ही गोष्ट जाणवली, की जसं मी पूर्वी ज्या गोष्टींमधून फॅट मिळतात त्या गोष्टी म्हणजेच भात, दूधाचे पदार्थ व तूप यांसह विविध पदार्थ खाणं सोडलं होतं. मात्र, मी आता माझ्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडवून आणले आहेत. मार्शल आर्ट करत असताना दीड वर्षापूर्वी माझी पाठ दुखावली होती.

त्यादरम्यान मी दवाखान्यात उपचारही घेत होते. त्यावेळी मला डॉक्टरांनी सल्ला दिला होता, की खूप डाएटिंग करू नका. दूध, तूप, भात, सर्व प्रकारच्या डाळी, सर्व प्रकारच्या फळभाज्या आणि पालेभाज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत. मी आता निसर्गानं दिलेले सर्व प्रकारचे पदार्थ खाते. मात्र, शरीराला घातक असणारं जंक फूड मी आवर्जून टाळते.

दूध आणि तुपातून शरीराला आवश्यक असणारं कॅल्शियम मिळत असतं. डाएटिंग म्हणजे तुम्ही फक्त सॅलडच खा, असं नाही. आता मी माझी जीवनशैली ठरवून घेतली आहे. मी जेवढं वर्कआउट करते, मेहनत करते, त्याचप्रमाणात आहारही घेते.

हेही वाचा :

कोल्हापूर : गोकुळची पूर्ण ताकद लावतो, अध्यक्षांचा थेट मुख्यमंऱ्यांना फोन

PM मोदींना ‘पुतिन’ मॉडेल आणायचंय, हाच मोठा धोका; संजय राऊत यांचा घणाघात

तू सेक्सची निवड कर..; अरबाज खानचा मुलाच्या मित्राला अजब सल्ला, मलायकाची प्रतिक्रिया चर्चेत