विदर्भ-मराठवाड्याला ‘अवकाळी’चा तडाखा; नागपुरात मुसळधार पाऊस

सलग चौथ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ (smoke)घातला आहे.


भिलार : राष्टवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी काल सकाळी प्रतापगडावर जाऊन श्री भवानीमातेचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला. क्षेत्र महाबळेश्वर येथे जाऊन अभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर आमदार शिंदे यांनी प्रतापगड येथे जाऊन श्री भवानीमातेचे दर्शन घेतले. प्रचाराला प्रारंभ केला.(smoke)

सातारा : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्‍यावर साताऱ्यातील एका खासगी रुग्‍णालयात उपचार सुरू असून, हृदय रक्‍तवाहिनीतील अडथळा दूर करणारी शस्‍त्रक्रिया त्‍यांच्‍यावर करण्‍यात आली आहे. शस्‍त्रक्रियेनंतर त्‍यांची प्रकृती स्‍थिर आहे.

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. १३) अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यात राजकीय उलथापालट होण्याची शक्यता आहे. ते सायंकाळी लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

सलग चौथ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. नागपुरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त केली. तसेच देशातील वातावरणात बदल जाणवत असून काही भागांत पाऊस पडत आहे. यासह देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

हेही वाचा :

कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यानं सांगलीचा प्रश्न निर्माण झाला?

Hyundai Grand i10 नवीन व्हर्जनमध्ये लाँच; जबरदस्त लूक आणि दमदार इंजिन

हातकणंगलेत तीन अपक्ष आमदारांची बंद खोलीत चर्चा; कोरे-आवाडे- यड्रावकरांचं काय ठरलं