अटकेनंतर वजन 7 किलोने घटले असून शरीरातील कीटोनची पातळी वाढली आहे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, असे स्पष्ट करत वैद्यकीय कारणास्तव जामिनात आणखी 7 दिवसांची वाढ करावी. अशी मागणी करणारी नवी याचिका कथित दिल्ली (delhi)मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी 1 जूनपर्यंत जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
ईडीने अटक केल्यानंतर 50 दिवसांनी केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला होता. 10 मे रोजी त्यांची दिल्लीतील(delhi) तिहार तुरुंगातून सुटका झाली. ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना विशेष सवलत दिली नसल्याचे स्पष्ट केले. जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवाल त्यांच्या प्रचारसभांत म्हणत होते, जर लोकांनी आपला मत दिले तर 2 जूनला तुरुंगात जावे लागणार नाही, असा दावा ईडीने केला होता.
डॉक्टरांनी अरविंद केजरीवाल यांना पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्पॅन तसेच इतर काही वैद्यकीय चाचण्या करण्याचा सल्ला दिला होता, ज्यामुळे केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी मुदतवाढ मागितली आहे. तुरुंगात असताना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली असूनही त्यांना इन्सुलिन दिले जात नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर त्यांना इन्सुलिन देण्यात आले होते.
हेही वाचा :
पुणे अपघाताने राजकीय वातावरण तापलं; मुश्रीफांची धंगेकरांना ‘वॉर्निंग’!
पंतप्रधान मोदींच्या ‘या’ बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!
कोल्हापुरात युवकास अटक, 5 लाख 30 हजार रुपयांच्या 11 दुचाकी जप्त