फडणवीसांकडून थेट सभागृहात जयंत पाटलांना भाजपा प्रवेशाची ऑफर?

राज्यातील शिंदे गटातील नेत्यांवर (political updates)सातत्याने वादग्रस्त आरोप होऊ लागले असताना, आता जलसंधारण मंत्री संजय राठोड हेही अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी मंत्री भरत गोगावले, मंत्री संजय शिरसाट, आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका झाली होती. आता राठोड यांच्यावरही थेट भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने एकनाथ शिंदे गटाच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात संजय राठोड यांना “दणका” दिला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपल्या आमदार, खासदार आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक ‘डॅमेज कंट्रोल’साठी घेतली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या वादाला सुरुवात झाली ती काही दिवसांपूर्वी, जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांचे जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे भाजप आमदार संदीप जोशी यांनी संजय राठोड(political updates) यांच्यावर गंभीर आरोप केले. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, “राठोड यांच्या जलसंधारण विभागात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. तब्बल आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक करण्यात आली आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

या आरोपांचं गांभीर्य लक्षात घेता संदीप जोशी यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिलं आहे. त्यामुळे हा वाद केवळ माध्यमापुरता न राहता आता प्रशासन पातळीवरही गांभीर्याने घेतला जात आहे.दरम्यान, या साऱ्या घडामोडीमुळे शिंदे गटावर दबाव वाढताना दिसतोय. विरोधकही यावरून सरकारवर टीका करण्याची संधी साधण्याची शक्यता आहे. आगामी काळात याप्रकरणी अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि आरोपांच्या मालिकेला दिवसेंदिवस उधाण येत आहे. काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यावर त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या वादग्रस्त नेमणुकांबाबत आरोप झाले होते. आता या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप करत जलसंधारण खात्याच्या कामांवरील सुधारित प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. हा निर्णय राठोड यांच्यासाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

राठोड यांनी सुनील कुशिरे या अधिकाऱ्यावर एकाच वेळी तीन अतिरिक्त पदांचा कार्यभार सोपवून विशेष मेहरबानी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या खात्याशी संबंधित मंजूर कामांवरील प्रशासकीय मान्यता फडणवीसांनी थेट रद्द केल्यामुळे राठोड अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या कारभारावर आता महायुतीतीलच काही आमदार नाराजी व्यक्त करत खासगीत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि महायुतीतील इतर नेतेही विविध वादांमध्ये अडकताना दिसत आहेत.आमदार अर्जुन खोतकर यांच्या धुळे दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या रूममध्ये रोकड सापडली, आणि सद्यस्थितीत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.रोहयो मंत्री भरत गोगावले हेही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनिल तटकरे आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. त्यानंतर त्यांचा एक विवादास्पद व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.

या सर्व घटनांमुळे महायुती सरकार आणि विशेषतः शिंदे गटाचे अनेक मंत्री आणि आमदार अडचणीत आले असून, सरकारची प्रतिमा धक्का बसत असल्याचे विरोधकांकडून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता पक्षातील अनुशासन आणि सार्वजनिक प्रतिमेचं रक्षण करणं हे मोठं आव्हान ठरत आहे.

हेही वाचा :

‘या’ लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार?; जाणून घ्या पात्रता आणि संपूर्ण माहिती

क्रूरतेची मर्यादा ओलांडली! आधी बेदम मारहाण अन् नंतर मृतदेहावर नाचले लोक VIDEO VIRAL

कोल्हापुरातील मुख्य चौकात मद्यधुंद तरुणाकडून महिला पोलिसाला दमदाटी