लहानपणी परींची कथा तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल मात्र तुम्हाला माहिती(times) आहे का? देशात असे एक ठिकाण देखील आहे ज्याला परींची भूमी म्हटले जाते. नैसर्गिक सुंदरतेने भरलेले हे ठिकाण कॅम्पिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.

आपण सर्वजण परिंच्या कथा ऐकत मोठे झाले आहोत. हवेत उडणाऱ्या पंख असलेल्या पऱ्या, ज्यांच्या हातात जादूची काडी असते आणि ज्या चमकदार राजवाड्यात राहतात. परींची ही कथा काल्पनिक (times) असली तरी त्यावेळी आपल्याला हे सर्वच खरं वाटायचं. वास्तविक, असे घडत नाही हे आपणा सर्वांना ठाऊक नाही मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? देशात असे एक ठिकाण आहे ज्याला ‘फेयरीलँड’ असे म्हटले जाते. पर्वतांमध्ये वेढलेल्या या ठिकाणचे सौंदर्य अलैकिक आहे आणि दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. आता परींचा देश म्हटले जाणारे हे ठिकाण खरंच जादुई आहे का? या ठिकाणात असे काय खास आहे ते चला सविस्तर जाणून घेऊयात.
या राज्यात वसलंय ठिकाण
तुम्ही आजवर अनेक पर्वतांना भेट दिली असेल मात्र फार क्वचितच लोकांनी पर्वतांमध्ये वसलेली परींची भूमी पाहिली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तराखंडच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये हे ठिकाण वसले आहे,(times) ज्याला परींची भूमी देखील म्हटले जाते. एका छोट्या गावात वसलेले हे हिल स्टेशन खरोखरच परिकथेच्या जगाची आठवण करून देते. येथील दऱ्या, ढगांनी झाकलेले पर्वत आणि शांतता, सर्वकाही इतके जादुई बनते की तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे सर्व खरोखर तुमच्यासोबत घडत आहे. जर तुम्हाला बालपणीच्या कथा सत्यात अनुभवायच्या असतील तर तुम्ही एकदा तरी या ठिकाणाला नक्कीच भेट द्यायला हवी. उत्तराखंडमधील खैत पर्वतावर हे ठिकाण वसले आहे ज्याला परींचा देश म्हटले जाते. हा पर्वत उत्तराखंडच्या एका लहान जिल्ह्यात गढवाल येथे आहे. जर तुम्ही येथे गेलात तर कमी बजेटमध्ये तुम्हाला खूप शांती मिळू शकते.
खैत पर्वतावर परी राहतात
तुम्ही स्वतः कल्पना करू शकता की जिथे परी राहतात ती जागा किती सुंदर असेल. या ठिकाणी दूरदूरवर हिरवळ पसरलेली आहे. या ठिकाणी अक्रोड आणि लसूण स्वतःहून उगवतात. कॅम्पिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, मात्र हे लक्षात घ्या की, इथे संगीत वाजवण्यास मनाई आहे. परींना आवाजात अजिबात आवडत नाही असे म्हटले जाते आणि यामुळेच इथे संगीत वाजवण्यास मनाई आहे.
परींची पूजा केली जाते
या पऱ्या गावाचे रक्षण करतात असा स्थानिकांचा समज आहे. येथे परिंचे एक मंदिर देखील आहे जिथे परीची पूजा केली जाते. हे मंदिर अजूनही गूढतेने भरलेले आहे. तुम्हालाह जर या ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही ऋषिकेशहून खाजगी गाडीने तेहरी गढवाल जिल्ह्यातील फेगुलीपट्टी या गावी जाऊ शकता. येथून तुम्ही चालत जाऊन खैत पर्वतावर पोहोचू शकता. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १०,००० फूट उंचीवर आहे. येथे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांती जाणवेल. पर्वतांवरील परींना अछारी असे म्हटले जाते.
हेही वाचा :
YouTube वर पैसे कमवणे आता अवघड! नियम बदलले, वाचा सविस्तर
घरात कडाक्याच भांडण झालं, नवऱ्याने रागारागात चौथ्या मजल्यावरुन उडी मारली; जागीच मृत्यू VIDEO VIRAL
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ‘या’ तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी; महाराष्ट्राचे लक्ष या निर्णयाकडे