प्रसिद्ध दिग्दर्शक यांचे निधन, वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध दक्षिणेतील दिग्दर्शक(director), अभिनेते आणि सिनेमॅटोग्राफर वेलू प्रभाकरन यांचे निधन झाले आहे. ‘रेड’ या तमिळ चित्रपटात काम करणारे वेलू प्रभाकरन आता या जगात नाहीत. त्यांनी आज म्हणजेच २८ जुलै रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

वेलू प्रभाकरन यांच्या निधनाचीही पुष्टी झाली आहे. असे सांगितले जात आहे की ते बऱ्याच काळापासून आजारी होते आणि काही दिवसांपासून आयसीयूमध्ये होते. आता त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांच्या या बातमीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. वेलू प्रभाकरन यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शन(director) केले आणि नंतर अ‍ॅक्शन चित्रपटांकडे वळले. याशिवाय त्यांनी ‘सरियाना जोडी’, ‘पुथिया आची’, ‘कडावुल’, ‘कढल कढाई’ आणि ‘इयाकुनारिन कढल डायरी’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले तसेच लेखन आणि छायांकनाची जबाबदारीही घेतली. तसेच त्यांचे उद्योग क्षेत्रात देखील मोठे योगदान आहे, जे कधीच विसरता येणार नाही.

आता अशी माहिती समोर येत आहे की, वेलू प्रभाकरन यांचे अंतिम संस्कार रविवारी म्हणजेच २० जुलै रोजी केले जाणार आहे. वृत्तानुसार, त्यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी म्हणजेच १९ जुलै रोजी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येईल. रविवार दुपारपर्यंत चेन्नईतील वलसारावक्कम येथे लोक सार्वजनिक दर्शन घेऊ शकतात. यानंतर, वेलू प्रभाकरन यांचे अंतिम संस्कार पोरूर स्मशानभूमीत केले जाणार आहे. जिथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक उपस्थित राहतील. आता या बातमीने चाहते भावूक होत आहेत.

आता चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर या ज्येष्ठ दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. वेलू प्रभाकरन यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने लोक दुःखी आहेत. दुसरीकडे, वेलू प्रभाकरन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी दोनदा लग्न केले होते. पहिले त्यांनी अभिनेत्री जयदेवीशी लग्न केले आणि तिच्यापासून वेगळे झाल्यानंतर, वयाच्या ६० व्या वर्षी ते पुन्हा अभिनेत्री शर्ली दाससोबत स्थायिक झाले.

हेही वाचा :

पडळकर व आव्हाड यांनी जे पेरलं तेच उगवलं….!

धक्कादायक ! सिगारेटसाठी लायटर दिलं नाही म्हणून आला राग; लोखंडी पान्याने केली भावाची हत्या

युवा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो….– प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे