आलियाचा ‘तो’ लूक पाहून चाहते घायाळ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

आलिया भट्ट सध्या तिच्या जवळच्या मैत्रिणी तान्या साहा गुप्ताच्या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सहभागी झाली आहे. हा लग्नसोहळा स्पेनमधील एका आलिशान आणि निसर्गरम्य व्हिला रिसॉर्टमध्ये पार पडत आहे. तिथून येणाऱ्या फोटो आणि व्हिडीओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ(viral ) घातला आहे. प्रत्येक फॅशनलूकमध्ये आलिया तिच्या सौंदर्याने आणि स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकते आहे.

नवीन फोटोमध्ये आलिया भट्ट एक स्टायलिश ब्लॅक स्ट्रॅपलेस गाऊन परिधान करून दिसते आहे. ज्यामध्ये थाय-हाय स्लिट असून तिचा ग्लॅमरस अंदाज उठून दिसतोय. हा लूक तिने मिनिमल एक्सेसरीज, नो-मेकअप फेस आणि स्लीक बनसह पूर्ण केला आहे. आलियाच्या या सोबर आणि एलिगंट लूकमुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे.

या वेडिंग सेरेमनीमध्ये आलिया तिच्या मैत्रिणीच्या ब्राइड्समेडची भूमिका साकारत आहे. ती नवरीच्या मागे उभी असलेली दिसते आहे, हातात पांढरी छत्री आणि फुलांचा बुके घेऊन. तिच्यासोबत तिच्या इतर मैत्रिणीही काळ्या गाऊनमध्ये दिसून येत आहेत. तर नवरी पारंपरिक ख्रिश्चन वेडिंग गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसते. हा फोटोज पाहून सोशल मीडियावर(viral ) चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटो आणि व्हिडीओंवर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी आलियाचा लूक ‘स्टनिंग’, ‘ड्रॉप-डेड गॉर्जियस’ असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे. काही चाहत्यांनी तर मजेशीर पद्धतीने म्हटलं- ‘हे लग्न आहे की फॅशन शो? आमच्या नजरा तर आलियावरून हटेनात!’

या डेस्टिनेशन वेडिंगमध्ये, जेव्हा हिंदू पारंपरिक पद्धतीने लग्न पार पडलं, तेव्हा आलिया भट्टने क्रीम शेडमधील ब्रॅलेट, मॅचिंग स्कर्ट आणि लांब ब्लेझर परिधान केले होते. या लूकमध्येही ती अत्यंत एलिगंट आणि क्लासी दिसत होती. तिच्या प्रत्येक आउटफिटमध्ये स्टाइल आणि कम्फर्ट यांचा सुंदर मेळ दिसून येतो.

फिल्मी करिअरच्या आघाडीवर, आलिया भट्ट लवकरच YRF च्या ‘स्पाय युनिव्हर्स’मध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. ती ‘अल्फा’ या चित्रपटात एक गुप्तहेर म्हणून दिसणार आहे. हा YRF चा पहिला महिला-केंद्रित अ‍ॅक्शन थ्रिलर असेल. या चित्रपटात तिच्यासोबत शर्वरी वाघ देखील दिसणार आहे आणि तो या वर्षी ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

 

याशिवाय, आलिया भट्ट संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत स्क्रिन शेअर(viral ) करणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कारण तो एका भव्य लव्ह-स्टोरीवर आधारित असून त्यात 1960-70 च्या पार्श्वभूमीची झलक पाहायला मिळणार आहे.

स्पेनमधील लग्नसोहळ्यात आलिया भट्टने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती केवळ एक प्रतिभाशाली अभिनेत्रीच नव्हे, तर एक स्टाइल आयकॉन देखील आहे. तिच्या प्रत्येक लूकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधले जाते आणि यावेळेसही ती ट्रेंडमध्ये राहण्यात यशस्वी ठरली आहे.

हेही वाचा :