महाराष्ट्रातील प्रमुक कृषी उत्पादनापैकी(Farmers) असणाऱ्या कापूस आणि सोयाबीनवर अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे त्या उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार आहे.
त्यामुळे या कामातील केवायसी व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे, तसेच केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरु करण्यात यावीत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विजयकुमार आवटे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना(Farmers) प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादित) अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 91 लाख हेक्टर वरील 83 लाख शेतकऱ्यांना 4194 कोटी अनुदान वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकरी खातेदारांची एकूण संख्या 96.17 लाख आहे. या शेतकऱ्यांपैकी तब्बल 75.31 लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमती पत्रे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 64.87 लाख खातेदार शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे.
या शेतकऱ्यांच्या माहितीपैकी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या डेटा सोबत 46.8 लाख शेतकऱ्यांचा डेटा जुळला आहे. तर ई पीक पाहणी नावांच्या डेटा पैकी 36 लाख नावे जुळलेली आहेत. त्यामुळे 10 लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत. हे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी दिले.
केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव घोषित केला आहे. यावर्षी सोयाबीनचे 73.27 लाख मेट्रिक टन इतके जबरदस्त उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य शासनाने किमान हवी भावाने सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्र शासनाने मान्यता दिली असून नाफेड व एनसीसीएफ मार्फत सोयाबीन खरेदीची केंद्रे उभारण्याचे काम गतीने पूर्ण करावेत. राज्य शासन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असा विश्वास कृषिमंत्री मुंडे यांनी दिला.
हेही वाचा:
‘या’ प्रसिद्ध गायिकेनं घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण ऐकून म्युझिक इंडस्ट्री हादरली!
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार
उपोषणाचा चौथा दिवस, आधाराशिवाय चालणं मुश्कील, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली