सांगलीत भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, ४ ऊसतोड मजुरांचा मृत्यू

सांगलीतून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. सांगलीत ऊसतोड(sugarcane) मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेने रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच आहे. सांगलीतही(sugarcane) भीषण अपघाताची घटना घडली. सांगली-सोलापूर महामार्गावर सोमवारी मध्यरात्री ही अपघाताची घटना घडली. ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर आणि भरधाव ट्रकचा सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

या भीषण अपघातात दुर्दैवाने चार ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामधील मृतांमध्ये दोन महिला, एका मुलगा आणि लहान मुलीचा समावेश आहे.

सांगली सोलापूर महामार्गावर ऊसतोड मजुरांचा ट्रॅक्टर सोमवारी मध्यरात्री जात होता. या ट्रॅक्टरमध्ये १० हून अधिक ऊसतोड कामगार आणि त्यांची मुले होती. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील चिकलगी भुयार येथील ऊसतोड कामगार असल्याची माहिती मिळत आहे. ते काम आटोपून परतत असताना सांगली-सोलापूर महामार्गावर अपघात झाला.

सांगली-सोलापूर महामार्गावरून जाणाऱ्या या ट्रॅक्टरला मागून ट्रकने जोरात धडक दिली. या दुर्दैवी अपघातात ४ मुजरांचा मृत्यू झाला आहे. तर काही मजूर जखमी झाले. या जखमींना मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

हेही वाचा :

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का; लोकसभा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम

एप्रिलच्या पहिल्याच दिवशी गुड न्यूज; GST संकलनात नवा रेकॉर्ड, सरकारच्या तिजोरीत जमा झाले इतके कोटी

विजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार? कारण वाचून अभिमान वाटेल