”मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे” शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

मुंबईः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राज्यामध्ये(political news) जातीय तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप करत शिवसेनेने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात आणि पोलिसात धाव घेतली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी जेजे पोलिस ठाण्यात मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे(political news) प्रवक्ते किरण पावसकर यांनी पत्रकार परिषदेतून ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मुंबईतल्या ३७ मशिदीतून फतवे काढले जात आहेत, बॅनर लावले जात आहेत, ठाकरे गटाला समर्थन देण्यासाठी आवाहन केलं जातंय. निवडणुका शांतपणे झाल्या पाहिजेत, पण मागच्या वर्षभरापासून विश्वप्रवक्ते बोलत होते की दंगली घडतील, हे ते का बोलत होते? असा सवाल पावसकरांनी राऊतांना उद्देशून केला.

किरण पावसकर पुढे म्हणाले की, अल्पसंख्याक हेसुद्धा शिवसेनेसोबत आहेत. पण त्यांचा वापर करुन घेणारे काही लोक आहेत, ही शरमेची गोष्ट आहे. दंगली घडवण्याचा मार्ग आमचा नाही पण रात्री १:३० वाजता जेजे पोलिस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सध्या मुंबईत काही बोर्ड लावले जात आहेत, फतवे जारी केले जात आहेत आणि ३७ मशिदीतून मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी फतवे काढले जात आहेत. मुंबईतल्या धार्मिक संस्था मत कोणाला द्यावे, हे सांगत आहेत आणि आम्ही उबाठाला सपोर्ट करतोय हे सांगत आहेत, या गंभीर प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.

पावसकरांनी दंगली करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ते कोणाच्या डोक्याने करत आहे स्वतःच्या की उद्धव ठाकरेंच्या हे तपसालं पाहिजे. मशिदी तोडल्याच नाहीत, तरीही तसं सांगितलं जातंय. जे झालचं नाही त्याचा बोर्ड लिहतात व उबाठाला मतदान करा, असं सांगत आहेत.

हेही वाचा :

‘RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,’ हर्षा भोगले यांनी सुनावलं, ‘किमान तुम्ही धोनीला…’

संजय शिरसाट यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा गौप्यस्फोट

मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास… योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल