ज्योतिषशास्त्राच्या(zodiac signs) दृष्टिकोनातून फेब्रुवारी 2025 हा महिना अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात बुध ग्रह दोनदा आपली राशी बदलेल.
यासोबतच सूर्य, मंगळ आणि गुरू या ग्रहांची(zodiac signs) स्थिती देखील बदलेल. ग्रहांच्या या बदलांमुळे फेब्रुवारी महिना काही राशींसाठी अत्यंत भाग्यवान ठरू शकतो.
चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी 2025 मध्ये कोणते ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत आणि याचा कोणत्या राशींना फायदा होईल.
फेब्रुवारी 2025 मधील ग्रहांचे राशीपरिवर्तन :
गुरू ग्रहाचे वृषभ राशीत भ्रमण : वैदिक कॅलेंडरनुसार, 04 फेब्रुवारी 2025 रोजी देवतांचा गुरू मानला जाणारा गुरू ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरू ग्रहाच्या या भ्रमणाचा काही राशींना लाभ होऊ शकतो.
बुध ग्रहाचे कुंभ राशीत भ्रमण : 11 फेब्रुवारी 2025 रोजी बुध ग्रह शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल.
सूर्य ग्रहाचे कुंभ राशीत भ्रमण : दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 12 फेब्रुवारी 2025 रोजी सूर्य ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे कुंभ राशीत सूर्य, बुध आणि शनी या ग्रहांचा त्रिग्रही योग तयार होईल.
मंगळ ग्रहाचे वृषभ राशीत भ्रमण : त्यानंतर मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करेल.
बुध ग्रहाचे मीन राशीत भ्रमण : महिन्याच्या शेवटी बुध ग्रह पुन्हा एकदा राशी बदलेल आणि मीन राशीत प्रवेश करेल.
हेही वाचा :
अजित पवारांच्या पक्षात चाललंय तरी काय? भुजबळांनंतर आणखी एक नेता पालकमंत्रिपदावरुन नाराज
चाहत्यांसोबत सेल्फी, थलपति विजयच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव जाहीर, पोस्टर व्हायरल
माहेरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीला आला राग; पाचव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन