महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाचवा हप्ता जमा; 5 कोटी 73 लाखांहून अधिक रक्कमेचा आर्थिक दिलासा

इचलकरंजी : राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि महायुती सरकारच्या(orders)प्रयत्नांतून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पाचवा व अंतिम हप्ता मिळाला असून, एकूण रु. 5 कोटी 73 लाख 17 हजार 775 इतकी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुमारे 2 कोटी 6 लाख रुपये तर सध्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 3 कोटी 67 लाखांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

या निधीमुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण असून, (orders)त्यांच्या पगारातील थकबाकी पूर्णपणे मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला होता. त्या अनुषंगाने राज्य शासनाने देखील सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली असून, थकबाकीच्या पाच हप्त्यांपैकी हा शेवटचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

या कामात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या सहकार्याने खासदार, आमदार, माजी आमदार, लोकप्रतिनिधी, कर्मचारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव आणि महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मोठ्या भूमिका बजावल्या. (orders)त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, कर्मचाऱ्यांच्या वतीने या सर्वांचे उपाध्यक्ष भाजप उमाकांत दाभोळे यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत.

पाचव्या हप्त्याचे वितरण दिनांक 29 जुलै 2025 रोजी आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आले. या निर्णयामुळे महापालिकेतील कर्मचारी वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे वेतन सातत्याने सुधारले जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा