सोशल मीडियावर सध्या एका हिंसक बैलाचा व्हिडिओ(Video ) फार वेगाने व्हायरल होत आहे. यात त्याने रस्त्यावर उभा असलेल्या या एका व्यक्तीवर निशाणा साधला आणि क्रूरपणे त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. आपल्या शक्तिशाली शिंगांनी त्याने आधी त्याला ओढत रस्त्याच्या मधोमध आणले मग आपल्या पायांनी त्याला चिरडायला सुरवात केल.
हे सर्वच दृश्य इतके भयानक होते की ते पाहून रस्त्यावरील इतर लोकही थक्क झाली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो आता वेगाने व्हायरल होत आहे. चला घटनेत काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
मुळातच बैल हा क्रूर प्रवृत्तीचा प्राणी आहे, तो कधी कुणावर हल्ला करेल याचा काही नेम नाही. त्यांचे कारनामे इतके आहेत की त्यांना वन्य प्राण्यांमध्ये गणले तर चुकीचे ठरणार नाही. बैल अनेकदा दिवसाढवळ्या रस्त्यावर चालणाऱ्या लोकांवर हल्ला करतात आणि आताच्या घटनेतही तसेच काहीसे घडताना दिसून आले. व्हिडिओमध्ये(Video ) तुम्ही पाहू शकता, यात एक माणूस लाल रंगाच्या स्कूटरजवळ उभा असल्याचे दिसून येते.
यादरम्यान, अचानक एक बैल त्याच्या जवळ येतो आणि आपल्या शिंगांनी व्यक्तीला खेचत रस्त्यावर ओढत आणतो. यानंतर तो व्यक्तीला रस्त्यावर लोळवत आपल्या पायांनी त्याला तुडवू लागतो. हे दृश्य फारच भयानक असून ते पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा आला.
Bull attacks on a Guy who was standing on Road:
https://t.co/9s68f3vwL8— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 3, 2025
व्यक्तीवर बैल आणखीन काही करेल तितक्यातच तिथे आजूबाजूची लोक मदतीला येतात आणि बैलाला हाकलवून काढतात. लोकांनी वेळीच व्यक्तीची मदत केली नाहीतर या हल्ल्यात व्यक्तीला गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून याला अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भारतीय शहरांमध्ये रस्त्यांवर फिरणाऱ्या बैलांना रोखले पाहिजेत. भटक्या कुत्र्यांचा आणि बैलांचा उपद्रव वाढत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “लाला गाडी आणि लाल शर्ट हेच कारण असेल त्याने हल्ला केल्याचा”.
हेही वाचा :