आधीच वाढलेल्या महागाईने सामान्य नागरिकांचा खर्च वाढवला (tiffin)असताना आता मुंबईतील डबेवाल्यांनी देखील मासिक टिफिन दरात वाढ केली आहे. जुलै महिन्यापासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरवाढीचं प्रमुख कारण म्हणजे वाढलेले इंधन दर, वाहतुकीचा खर्च आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव, असं मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितलं.डबेवाल्यांनी दर महिन्याच्या टिफिन सेवेवर 200 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पाच किलोमीटरच्या आत टिफिन पोहोचवण्याचा दर आता 1200 रुपयांवरून 1400 रुपये झाला आहे.

किती आहे नवीन मासिक शुल्क? :
पूर्वीचा दर (5 किमीच्या आत) – ₹1200
आता सुधारित दर (5 किमीच्या आत) – ₹1400
5 किमीहून अधिक अंतरासाठी – ₹300 ते ₹400 पर्यंत अतिरिक्त शुल्क
मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा ही जगभर प्रसिद्ध असून, दररोज हजारो कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरच्या जेवणाचा डबा वेळेवर पोहोचवण्याचं काम हे अत्यंत शिस्तबद्धपणे करतात. (tiffin)पण सध्याच्या आर्थिक दडपणामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरवाढीसोबतच पांडुरंगाच्या वारीमुळे 7 जुलै रोजी डबेवाल्यांची सेवा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. डबेवाल्यांचे शिष्टमंडळ 5 जुलै रोजी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. त्यानंतर ते 8 जुलैपासून पुन्हा सेवा सुरू करतील.
डबेवाल्यांचे कार्य हे केवळ एक सेवा नसून, मुंबईच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्या शिस्तबद्ध सेवेने आजवर हजारो मुंबईकरांची भूक वेळेवर भागली आहे. त्यामुळे त्यांच्या या दरवाढीला नागरिकांनी समजून घेतले,(tiffin) तर ती अडचण ठरणार नाही, असं मत अनेक ग्राहकांनीही व्यक्त केलं आहे.
हेही वाचा :
उबाठा सेनेत बेरजेचे नव्हे तर वजाबाकीचे राजकारण
सावधान! घरात मांजर पाळताय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड
चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..