सक्तीची राजकीय निवृत्ती!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एखाद्या कार्पोरेट कंपनी प्रमाणे राजकीय पक्ष(retirement) चालवायचा असतो का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी येत असेल तर मग तिथे संवेदनशीलता नसते. कोरडा व्यवहार असतो. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध आणि नैतिकता पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जात होता पण आता हा पक्ष एखाद्या कार्पोरेट कंपनी प्रमाणे चालवला जात असून त्याच्यातील संवेदनशीलता संपलेली आहे. त्याचा फटका मुंबईच्या पूनम महाजन आणि बीडच्या प्रीतम मुंडे यांना बसला आहे. या दोघींनाही लोकसभेची उमेदवारी भाजपने दिलेली नाही. महाजन आणि मुंडे या दोन घराण्यांची राजकीय उपयुक्तता भाजपासाठी संपलेली आहे असे म्हणता येईल.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे दोघेही मेहुणे पाहुणे. दोघांचेही सुरुवात अखिल(retirement) भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजप अशी झाली. आज महाराष्ट्रात जो भाजप एक मजबूत पक्ष म्हणून पुढे आलेला आहे त्याचा पाया महाजन आणि मुंडे यांनी घातला आहे. शिवसेनेशी असलेली भाजपची युती टिकवून ठेवण्यात या दोघांचेही योगदान मोठे होते. प्रमोद महाजन यांना तर भाजपचे संकट विमोचक म्हटले जायचे. प्रमोद महाजन हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी कौतुकाचा विषय होते.

प्रमोद महाजन यांचा घातपाती मृत्यू झाला तर गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. या दोघांच्या अकाली मृत्यूने महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या पश्चात भारतीय जनता पक्षाने पूर्ण महाजन, प्रीतम मुंडे यांना लोकसभेवर निवडून आणले. पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री करण्यात आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले नाही. आता प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे उमेदवारी देण्यात आली आहे.

पूनम महाजन ह्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसेवेवर गेल्या होत्या. यंदा त्यांना हॅट्रिक करण्याची संधी होती मात्र त्यांचे तिकीट कापून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवले आहे. बॉम्बे स्फोट मालिका खटला, 26/ 11 चा कसाब वरील खटला त्यांनी सरकारच्या वतीने चालवला होता. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये असलेल्या उज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा आहे. त्यांचे नाव मुंबई सह साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचा हा मोठा प्लस पॉईंट लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षांनी त्यांना उमेदवारी दिलेली आहे.

पूनम महाजन ह्या सलग दहा वर्षे खासदार होत्या पण त्यांची खासदारकी अभावानेच दिसली. त्यांचा एकूण परफॉर्मन्स जेमतेम होता. परफॉर्मन्स नसलेल्यांना कार्पोरेट कंपनीमध्ये नारळ दिला जातो. तसे महाजन यांच्या बाबतीत घडले आहे. प्रीतम मुंडे यांना सुद्धा तोच न्याय भाजपने दिला आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पर्यंत एकदम चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली आहे.

सुरेश प्रभू हे सुद्धा असेच अभ्यासू नेते भाजपामध्ये होते. रेल्वे मंत्रालय त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळले होते. बुलेट ट्रेन बद्दल प्रतिकूल मत व्यक्त केल्यानंतर त्यांना अडगळीत टाकण्यात आले. आता तर ते राजकीय विजनवासात आहेत. भाजपामधील संवेदनशीलता संपल्यानंतर नैतिक पातळीवर ही घसरण झाली आहे. विविध राजकीय पक्षांमधील एकूण 25 नेत्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी कारवाया केल्या त्यापैकी 23 नेते सध्या भाजपाने स्वीकारलेले आहेत. मूळनिष्ठावंतांना पक्ष नीतीचा धाक दाखवून गप्प बसवणाऱ्या भाजपाने नव्याने आलेल्यांना प्रतिष्ठा आणि पदे बहाल केली आहेत. कार्पोरेट कंपन्या अशाच प्रकारचे धोरण चालवतात. आता भारतीय जनता पक्ष हा कार्पोरेट कंपनी प्रमाणे चालवला जात असेल तर यापेक्षा वेगळे काही घडू शकणार नाही, असे म्हणावे लागेल.

हेही वाचा :

शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे