महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या(youth programs) प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाल्यानंतर आज महाविकास आघाडीच्या युवा फळीच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांच्या सभा कोल्हापूर लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर(youth programs) असणार आहे. त्यांच्या कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि युवा नेते रोहित पाटील यांच्या सुद्धा सभांचा धडाका आज कोल्हापूरमध्ये असणार आहे.

आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील उपस्थित राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांची पहिल्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ पेटवडगावमधील नगरपालिका चौकामध्ये जाहीर सभा होणार आहे. यानंतर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ हिंदमाता तालीम चौक उचगावमध्ये जाहीर सभा होणार आहे.

रोहित पाटील आज सायंकाळी सहा वाजता शाहू महाराजांच्या प्रचारार्थ बजाप माजगावकर तालीम शेजारी, पापाची तिकटी परिसरात प्रचार सभा घेणार आहेत. यानंतर सायंकाळी आठ वाजता कदमवाडी चौकामध्ये त्यांची प्रचार सभा होणार आहे.

दरम्यान, एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा सुद्धा होणार आहे. याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सुद्धा जाहीर सभेच्या निमित्ताने इचलकरंजीमध्ये येत आहेत. दोन्ही सभांची वेळ एकच असल्याने तीन दिग्गजांच्या प्रचाराच्या तोफा एकाच दिवशी वस्त्र नगरीत धडाडणार आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सभा होणार आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा या दिवशी सायंकाळी पाच वाजता थोरात चौकामध्ये होणार आहे.

हेही वाचा :

सक्तीची राजकीय निवृत्ती!

शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

मोदींना प्रत्येक टप्प्यात महाराष्ट्रात यावं लागतंय, हाच मराठा समाजाचा विजय : मनोज जरांगे