उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता…

राज्यात सध्या .लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी(battlefield 2042) सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तसेच ठाकरे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप केला आहे.

“महाविकास आघाडीची सत्ता असताना हॉटेल(battlefield 2042) हयात मध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या. उध्दव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू, असा त्यांचा डाव होता. ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या मीटिंगमध्ये उपस्थित होते,” असा मोठा दावा राजू वाघमारे यांनी यावेळी केला.

तसेच “गडचिरोलीत एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंकडून सुरक्षा देण्यात आली नव्हती. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, असा खळबळजनक आरोपही राजू वाघमारे यांनी यावेळी केला. तसेच मी एक दिवसाआड एक एक गोष्ट बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान,” काँग्रेसकडून सतेज पाटील यांना लोकसभा लढण्याच्या स्पष्ट सुचना होत्या. मात्र त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. स्वतः वरचे संकट त्यांनी टाळत महाराजांना रिंगणात उतरवले, असा दावाही राजू वाघमारे यांनी यावेळी केला. तसेच शाहू महाराजांचा अवमान केल्याबद्दल राहुल गांधी आणि सतेज पाटील यांनी माफी मागावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा :

सक्तीची राजकीय निवृत्ती!

महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात

शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत