गौतम गंभीरचा इंग्लंडच्या ग्राऊंडमॅनवर चढला रागाचा पारा, सर्वांसमोर धमकी, Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. यजमान संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यांनी लीड्स आणि लॉर्ड्स येथे दोन सामने जिंकले. भारताने बर्मिंगहॅममध्ये विजय मिळवला आहे. आता मालिका अनिर्णित राहण्यासाठी त्यांना शेवटचा सामना जिंकावा लागेल. या सामन्यापूर्वी ओव्हल येथे एक मोठी घटना घडली. भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर(sports news) यांनी ओव्हलच्या ग्राउंड्समनला फटकारले.

गंभीर आणि लंडनच्या ओव्हल मैदानाचे हेड ग्राउंड्समन ली फोर्टिस यांच्यात जोरदार वाद झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंभीरने क्युरेटरला स्पष्ट सांगितले की, “तुम्ही आम्हाला काय करायचे ते सांगू शकत नाही.” त्यांच्याशिवाय फलंदाजी प्रशिक्षक सिताशु कोटक यांनीही फोर्टिसशी संवाद साधला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये गंभीर खूपच रागावलेला दिसत आहे.

हा व्हिडिओ भारताच्या सराव सत्रातील असून खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये गंभीर असे म्हणताना ऐकू येते की, “तुम्हाला जो रिपोर्ट करायचा आहे तो करा… तुम्ही फक्त ग्राउंड्समन आहात.” व्हिडिओमध्ये (sports news)हीच ओळ सतत दाखवली जात आहे. गंभीर मैदानावरील खेळाडूकडे बोट दाखवत आहे. वादाचे कारण अद्याप कळलेले नाही.

गेल्या काही आठवड्यांपासून ही मालिका सतत चर्चेत आहे आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना नाहक त्रास दिल्याचेही दिसून येत आहे. अलिकडेच, ओल्ड ट्रॅफर्ड येथील शेवटच्या कसोटीत, बेन स्टोक्सने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना ड्रॉ करण्याची ऑफर दिल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

या घटनेनंतर, ओव्हलचे पिच क्युरेटर ली फोर्टिस यांनी त्यांच्या बचावात म्हटले की, “येणारा सामना खूप मोठा आहे. तो (गौतम गंभीर) आनंदी आहे की नाही हे माझे काम नाही. मी आजपर्यंत त्याला कधीही भेटलो नाही. आज सकाळी तो कसा वागत होता हे तुम्ही पाहिले. काही हरकत नाही, मी ठीक आहे. आमच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही…”

मँचेस्टर(sports news) सामना बरोबरीत सुटला आणि इंग्लंड अजूनही मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे. भारताला बरोबरी साधण्याची संधी आहे आणि गंभीर दबावाखाली आहे. प्रशिक्षक म्हणून त्याने आतापर्यंत १४ कसोटींमध्ये फक्त चार विजय मिळवले आहेत. “गेले पाच आठवडे दोन्ही देशांसाठी खरोखरच रोमांचक होते.

ज्या प्रकारच्या क्रिकेटचे प्रदर्शन झाले त्यामुळे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला अभिमान वाटला आहे याची मला खात्री आहे. दोन्ही संघांनी खूप जोरदार प्रहार केले आणि प्रत्येक रन्ससाठी लढा दिला. आपल्याकडे आणखी एक आठवडा आहे आणि हा एक शेवटचा धक्का. आपल्या देशाला अभिमान वाटावा अशी शेवटची संधी आहे. जय हिंद,” असे गंभीर सोमवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासोबत झालेल्या टीम मीटिंगमध्ये म्हणाला आहे.

हेही वाचा :

हरियाणा शाळा बंद: हरियाणामधील शाळा ३१ जुलैपर्यंत बंद राहतील, हे आहे कारण

चीनमध्ये, बोट चोखणे थांबवण्याच्या प्रयत्नात, एका मुलाच्या बोटाला सूज आली आणि ऊतींना नुकसान झाले, डॉक्टरांनी इशारा दिला

WCL च्या मैदानावर मोठं ट्विस्ट! भारत-पाक मॅच रद्द होणार? प्रायोजकांची माघार, धक्कादायक कारण…