हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी कार्बन फूटप्रिंट कमी करणे(lye) अत्यावश्यक आहे. निसर्गावर होत असलेला मानवी हस्तक्षेप, वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि ऊर्जेचा अमर्याद वापर यामुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.

कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या व्यक्ती, संस्था किंवा देशाच्या दैनंदिन उपभोगातून वातावरणात सोडले जाणारे कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायूंचे एकूण प्रमाण. आपल्या (lye) जीवनशैलीतील अनेक कृती जसे की वाहनांचा वापर, विजेचा- पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर, अन्न आणि वस्तूंचा अपव्यय यांमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कार्बन उत्सर्जन वाढते. हे उत्सर्जन वातावरणात साचत राहते आणि त्यातून हवामान बदलाचे संकट अधिकच गंभीर बनते.
त्याचेच परिणाम म्हणजे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होऊन तापमान वाढ, समुद्राची वाढती पातळी, पूर, दुष्काळ, गारपीट, वादळे आणि जैवविविधतेचा नाश यांसारख्या संकटांना सामोरे जावे (lye) लागत आहे. हे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आता प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे.
सध्या संपूर्ण जग हवामान बदलाच्या दुष्परिणामांना सामोरे जात आहे. एकीकडे तापमानवाढ, तर दुसरीकडे अनियमित पावसाळा, पूर, दुष्काळ, वादळे आणि समुद्राची वाढती पातळी यांसारख्या समस्या मानवी जीवनावर मोठा परिणाम घडवून आणत आहेत. महाराष्ट्र आणि भारतातही या बदलांची तीव्रता वाढत आहे.
यावर्षीच्या उन्हाळ्यात अनेक भागात तापमानाने विक्रमी उच्चांक गाठला. पुण्यात एप्रिल महिन्यातच ४० अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता जाणवली. एकीकडे हे तापमानवाढीचे चित्र, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक भागांत अनपेक्षित अवकाळी पाऊस व गारपीट झाली. ही दोन्ही टोकाची स्थिती म्हणजेच हवामान बदलाचे स्पष्ट लक्षण आहे. याचा थेट संबंध येतो तो कार्बन फूटप्रिंट या संकल्पनेशी.
वाढती कार्बन फूटप्रिंट म्हणजे अधिक प्रमाणात तापमानवाढ, बर्फ वितळणे, समुद्राची वाढती पातळी, अन्न उत्पादनावर परिणाम, वन्यजीवांचे अधिवास नष्ट होणे आणि शेवटी मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. उष्माघात, दमा, त्वचारोग, जलजन्य आजार यांचे प्रमाण वाढते. हवामानातील हे टोकाचे बदल समाजातील आर्थिक आणि सामाजिक असमतोल अधिक वाढवतात.
शहरांमध्ये लोकसंख्या अधिक असल्यामुळे वाहनांची संख्या, इमारतींचा विस्तार, वीजेचा अपव्यय, कचऱ्याचे वाढते प्रमाण, प्लास्टिकचा वापर हे सर्व घटक कार्बन उत्सर्जनात मोठी भर घालतात. मात्र, यासाठी उपाय शोधण्यास पुण्यातील काही गृहनिर्माण सोसायट्या पुढे आल्या आहेत. सौरऊर्जेचा वापर, सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती, सायकलचा वापर, ई-वाहनांची निवड ही काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनीही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान योजना, ग्रीन बिल्डिंग्स धोरण, प्लास्टिक बंदी, पर्यावरण जनजागृती मोहीमा, हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, या यशस्वी होण्यासाठी केवळ शासन नव्हे, तर सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.
सध्या कार्बन फूटप्रिंटचे प्रमाण फार वाढत आहे. ते पाणी, हवा अशा विविध स्वरूपातून वाढते ज्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही वॉटर फूटप्रिंटसाठी काम करतो. यामध्ये नदी-नाल्यांमध्ये जाणारे सांडपाणी कमी करण्यासाठी त्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी काम करतो. तसेच ग्रीन बिल्डिंग्स वाढीसाठी प्रयत्न करत आहोत. मात्र, व्यक्तिगत पातळीवर यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण गाड्यांचा वापर कमी करून मेट्रोचा वापर वाढवायला हवा. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा वर्गीकरण केल्यास आपण कार्बन फूटप्रिंट कमी करू शकतो. सोसायटीच्या अवतीभोवती झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
हेही वाचा :