इंटेलिजन्स ब्युरो (IB) म्हणजेच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय गुप्तचर यंत्रणा येथे असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO) ग्रेड II/कार्यकारी पदांसाठी भरतीची(Recruitment) मोठी संधी जाहीर झाली आहे. या मेगाभरतीअंतर्गत एकूण ३७१७ रिक्त पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. १९ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.

पदांची तपशीलवार माहिती :
सामान्य (General) – 1537
आर्थिक दुर्बल घटक (EWS) – 442
इतर मागासवर्गीय (OBC) – 946
अनुसूचित जाती (SC) – 566
अनुसूचित जमाती (ST) – 226
पदाचे नाव: ACIO ग्रेड II / Executive
एकूण पदे: 3717
विभाग: गृह मंत्रालय, इंटेलिजन्स ब्युरो (IB)
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून(Recruitment) कोणत्याही शाखेतील पदवीधर
इतर आवश्यकता: संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा: किमान १८ वर्षे, कमाल २७ वर्षे (दाखल तारीख: १० ऑगस्ट २०२५)
अर्ज शुल्क :
सामान्य, OBC, EWS (पुरुष) – 650 रुपये
सर्व महिला, SC/ST उमेदवार – 550 रुपये
अर्ज कसा कराल? :
– अधिकृत वेबसाईट www.mha.gov.in ला भेट द्या
– “ACIO Recruitment 2025” लिंकवर क्लिक करा
– नवीन नोंदणी करा आणि लॉगिन करा
– अर्जातील सर्व माहिती भरून फॉर्म सबमिट करा
– शुल्क भरून अर्ज सबमिट करा आणि प्रिंटआऊट घ्या
हेही वाचा :
वादळी वाऱ्याचा इशारा, राज्यात कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट
राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट!
लिप फिलर झालं फेल, चेहऱ्याची दुर्दशा; उर्फी जावेदचा धक्कादायक व्हिडिओ