सुवर्णसंधी! CV ठेवा तयार, IT कंपन्यांमध्ये भरती सुरु

एक वर्षाहून अधिक काळ, भारतासह जगभरातील आयटी(IT) क्षेत्रातून खूप नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. सततच्या नोकरकपातीमुळं आर्थिक मंदीमुळं आयटी कंपन्यांनीही फ्रेशर्सच्या भरतीवर बंदी घातली होती. मात्र, अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय आयटी(IT) कंपन्यांनी आता मोठ्या प्रमाणात भरती सुरु केली आहे. फक्त फ्रेशर्ससाठी कॅम्पस हायरिंग सुरु केलीय. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या IT कंपन्यांनी कॅम्पस भेटी सुरू केल्या आहेत.

दर नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपन्या चांगला पगारही देण्यासही तयार आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यावर काम करावे लागेल. आयटी कंपन्यांना सध्या क्लाउड, डेटा आणि एआय सारख्या भूमिकांसाठी लोकांची निवड करायची आहे. IBM, Infosys, TCS आणि LTIMindtree सारख्या अनेक IT कंपन्यांनी देखील कॅम्पसला भेट देण्यास सुरुवात केली आहे.

मात्र, यावेळी निवड प्रक्रिया अगदी वेगळी असणार आहे. ज्या कंपन्या आतापर्यंत भरपूर नोकऱ्या देत होत्या त्या आता निवडक लोकांनाच निवडतील. त्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा ॲनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे ज्ञान असलेल्या लोकांची गरज आहे. अशा भूमिकेसाठी वेतन पॅकेजही 6 ते 9 लाख रुपये असणार आहे.

देशातील कॅम्पस प्लेसमेंट्स जुलैपासून सुरू होणार आहेत. याशिवाय ऑफ कॅम्पस जॉइनिंगही केले जाणार आहे. याद्वारे TCS ने सुमारे 40 हजार फ्रेशर्स, इन्फोसिस 20 हजार आणि विप्रो 10 हजार फ्रेशर्स जोडण्याची योजना आखली आहे. विप्रोचे एचआर प्रमुख सौरभ गोविल यांनी सांगितले की, आम्ही एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा कॅम्पस हायरिंग सुरू करणार आहोत. यावेळी कट ऑफ 60 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या कॅम्पस हायरिंगमध्ये कंपन्या तुमचे शिक्षण, कौशल्ये, प्रमाणपत्रे तसेच सोशल मीडिया प्रोफाइलवर बारीक नजर ठेवणार आहेत. असे केल्याने कंपन्यांना तुमची संपूर्ण पार्श्वभूमी समजून घ्यायची आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी पदवीधरांसाठी येणारे काही महिने मोठी संधी आहेत. या काळात तो स्वत:च्या उणिवा शोधू शकतो आणि कंपन्यांच्या मागणीनुसार स्वत:ला तयार करू शकतो.

हेही वाचा:

सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; विष प्राशन केले अन्…

सरकारचा महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘त्या’कठीण दिवसांत मिळणार पगारी सुट्टी

IPL 2025 चं मेगा ऑक्शनचं ठिकाण ठरलं! भारताबाहेर होणार लिलाव