रक्षाबंधनाआधी गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता(allowance)ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ जाहीर होऊ शकते.सातव्या वेतन आयोगांतर्गत वाढ लागू केली जाणारAICPI-IW निर्देशांकाच्या आधारे भत्त्याची गणना केली जाते लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्च महिन्यामध्ये दोन टक्के डीए महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. त्यामुळे महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत वाढला. आता यामध्ये आणखी तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातमोठी वाढ होऊ शकते.

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा करण्यात येईल. पण त्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळू शकते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन ते चार टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्र सरकार डीए वाढीची घोषणा करू शकते.महागाई लक्षात घेऊन सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. एक जानेवारी आणि १ जुलै या तारखेपासून महागाई भत्ता लागू होतो.(allowance) मार्चमध्ये जाहीर झालेला भत्ता 1 जानेवारीपासून लागू मानला गेला आहे. आता होणारी घोषणा 1 जुलै 2025 पासून लागू मानली जाईल. डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिले जाणाऱ्या पेन्शनवर लागू होते.

अखिल भारतीय औद्योगिक कामगार उपभोक्ता मूल्य निर्देशांक च्या आधारावर (allowance)कामगारांसाठी महागाई भत्त्याची गणना केली जाते. AICPI-IW निर्देशांक देशातील 88 औद्योगिक केंद्रांमधील 317 बाजारांमधून गोळा केलेल्या किरकोळ किंमतींच्या आधारावर जाहीर केला जातो. डीएमध्ये सुधारणा करण्यापूर्वी सरकारकडून मागील सहा महिन्यांचा डेटा तपासते.

हेही वाचा :

एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार; भरधाव बसने दुचाकीला फरफटत नेलं

क्षणातच शार्क माशाने व्यक्तीला चावून चावून खाल्लं; रक्तरंजित पाणी अन् Video Viral

शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग