T-20 World Cup दरम्यान आयसीसीकडून हार्दिक पंड्यासाठी गुड न्यूज..

टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पंड्या पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. आयपीएलमधील खराब प्रदर्शना (exhibition) मुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झालेली पाहायला मिळालेली. मुंबई इंडियन्ससारख्या संघाची कॅप्टन्सी मिळाल्यावर यंदाच्या मोसमात त्याला खास काही करता आलं नाही. एक कॅप्टन म्हणून तर तो अयशस्वी ठरला पण त्याचा वैयक्तिक फॉर्मही काही खास राहिला नाही. टी-२० वर्ल्ड कप टीममध्ये हार्दिकच्या निवडीवरूनही अनेकांनी त्याची निवड योग्य नसल्याचं म्हटलं होतं. परंतु हार्दिकने आपल्या प्रदर्शनातून सर्वांना उत्तर दिलं आहे. आतापर्यंत टीम इंडियाच्य झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये केलेली कामगिरी दमदार होती.

हार्दिक पंड्या टीममध्ये असल्याने एक संतुलित संघ झाल्याचं दिसतं (exhibition). कॅप्टन रोहितकडे त्यामुळे अनेक पर्याय खुले होतात आणि इतर गोलंदाजांचाही नेमक्या वेळी वापर करण अगदी सोपं जातं. हार्दिक पंड्या असा गोलंदाज आहे जो सामन्याची पहिली ओव्हर असो किंवा डेथ ओव्हर्स कुठेही त्याचा वापर केला जाऊ शकतो. हार्दिक पंड्यानेही वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत केलेल्या प्रदर्शनामधून त्याची उपयुक्तता दाखवून दिली आहे.हार्दिकने घेतलेल्या मेहनतीचं फळ अखेर त्याला मिळालं आहे.

हार्दिकसाठी आनंदाची बातमी
हार्दिक पंड्या याची कामगिरी पाहिली तर तीन सामन्यात त्याने सात विकेट घेतल्या आहेत. पहिलाच सामना आयर्लंडसोबत झाला त्यांच्याविरूद्ध त्याने 3, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्याविरूद्ध दोन-दोन विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे येत्या सामन्यांमध्ये त्याच्याकडून सर्वांनाच अपेक्षा असणार आहेत. हार्दिकने् घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे. आयसीसीने टी-२० रँकिंग यादी जाहीर केली त्यामध्ये त्याने बढती मिळवली आहे. पंड्या या यादीत टॉप-10 मध्ये सातव्या क्रमांकावर पोहोचला आहेत.

दरम्यान, हार्दिक पंड्या ऑल राऊंडरच्या (exhibition) यादीमध्ये फक्त एकटाच भारतीय खेळाडू आहे. या यादीमध्ये अफगाणिस्तान संघाचा माजी कॅप्टन आणि हुकमी खेळाडू मोहम्मद नबी याची पहिल्या स्थानावरून घसरण झाली आहे. मोहम्गद नबी थेट चौथ्या स्थानी गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉयनिसने पहिलं स्थान मिळवलं आहे.

हेही वाचा :

राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता: नाना पटोले

गेल्या 24 तासात दिल्लीत 14 तर उत्तर प्रदेशमध्ये 81 लोकांचा मृत्यू…

नांदेड सकल ओबीसी समाजाचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा