गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सकारात्मक होणार आज शेअर बाजाराची सुरुवात

जागतिक बाजारपेठेतील तेजीचा विचार करता तज्ज्ञांनी असे संकेत दिले आहेत की आज २२ जुलै रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स(Stock market) आणि निफ्टी ५० सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१८४ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ५६ अंकांनी जास्त होता.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होत होती. त्यानंतर आज असा अंदाज वर्तवण्यात आला आहे की, शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक पातळीवर होऊ शकते. जागतिक बाजारातील उत्साहवर्धक संकेतांनंतर, देशांतर्गत शेअर बाजारातील(Stock market) बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, मंगळवारी वाढण्याची अपेक्षा आहे.

सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजार निर्देशांकांमध्ये जोरदार वाढ झाली, बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ४४२.६१ अंकांनी म्हणजेच ०.५४% ने वाढून ८२,२००.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२२.३० अंकांनी म्हणजेच ०.४९% ने वाढून २५,०९०.७० वर बंद झाला.

सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ६६९.७५ अंकांनी म्हणजेच १.१९% ने वाढून ५६,९५२.७५ वर बंद झाला. सोमवारी, भारतीय शेअर बाजार(Stock market) निर्देशांकांनी उच्चांक गाठला. निफ्टीमध्ये इटरनल, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक या शेअर्सनी उत्तम कामगिरी केली तर रिलायन्स, विप्रो आणि इंडसइंड बँक हे शेअर्स घसरले.

प्रभुदास लिल्लाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी आज गुंतवणूकदारांसाठी १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी चार इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एसजेव्हीएन, लॉयड्स एंटरप्रायझेस, आंध्र पेपर आणि मोरेपेन लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार पेटीएम , डिक्सन टेक्नॉलॉजीज, आयआरएफसी , आयडियाफोर्ज, इंटरनल, ओबेरॉय रियल्टी, मंगलोर केमिकल्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, स्टेट बँक ऑफ इंडिया, ३६० वन डब्ल्यूएएम, सीआयई ऑटोमोटिव्ह या स्टॉक्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना एसजेव्हीएन, लॉयड्स एंटरप्रायझेस आणि सीमेन्स या स्टॉक्सची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना नेलकास्ट, व्हिंटेज कॉफी अँड बेव्हरेजेस , रॉयल ऑर्किड हॉटेल्स , केम्प्लास्ट सन्मार आणि केआरबीएल या स्टॉक्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

हेही वाचा :

टीम इंडियावर नवे संकट, तोडावे लागेल इंग्लंडचे ‘चक्रव्यूह’; पिचचा भयानक चेहरा…

आज मंगळवारी ‘या’ 6 राशींवर प्रसन्न होणार गणराया! मनातल्या इच्छा होतील पूर्ण, आजचे राशीभविष्य वाचा

फक्त 10 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर सुद्धा मिळेल Tata Punch ची किल्ली, किती असेल EMI?