सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! जूनमध्ये महागाई घटली, ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. जून 2025 मध्ये देशातील घाऊक (news)महागाई दर 20 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये घाऊक किंमत निर्देशांक वर आधारित महागाई दर.013 % होता, जो ऑक्टोबर 2023 नंतरचा सर्वात कमी आहे. याआधी मे महिन्यात हा दर 0.39 % होता.

सोमवारी 14 जुलै जाहीर झालेल्या आकडेवारीत महागाई घटल्याचे समोर आले आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमतीत घट झाल्यामुळे महागाई दर आटोक्यात आला असल्याचे समोर आले आहे.(news) जूनमध्ये भाज्यांचा महागाई दर 22.65 % होता, जो मे महिन्यात असलेल्या 21.62 % होता. कांद्याच्या महागाईचा दर मे महिन्यात 33.49% होता, जो जूनमध्ये 14.41 % पर्यंत खाली आला. जून महिन्यात बटाट्याच्या किमतीत 32.67 % ची घसरण झाली आहे. डाळींच्या किमती 22.65 % ने घसरल्या आहेत. स्वयंपाकघरातील वस्तू स्वस्त झाल्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.

देशातील इंधन आणि विजेच्या किमतीत घट झाली आहे, यामुळे महागाई कमी झाली. जूनमध्ये ही इंधन आणि विजेचा महागाई दर 2.65 % होता, जो मे महिन्यात 22.27 % होता. याचाच अर्थ इंधन आणि विजेच्या किमतीत मोठी घट झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

घाऊक महागाई दरासह किरकोळ महागाई दरातही घट झाली आहे(news). मे 2025 मध्ये हा 2.82 % या सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. फेब्रुवारी 2019 नंतरचा हा सर्वात कमी किरकोळ महागाई दर आहे.रिझर्व्ह बँकेच्या बैठकीतून, अन्नपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी होत आहे अशी माहिती समोर आली होती. आरबीआयने आर्थिक वर्ष 2026 साठी महागाई दर 4.2 % वरून 4 % पर्यंत कमी केला आहे. हा दर पहिल्या तिमाहीत 3.6%, दुसऱ्या तिमाहीत 3.9%, तिसऱ्या तिमाहीत 3.8% आणि शेवटच्या तिमाहीत 4.4% राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर

महाराष्ट्रामधील Ola ची 385 शोरूम अचानक बंद… लाखो ग्राहकांना बसणार मोठा फटका

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स, वाचा सविस्तर