राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार नवीन योजना सुरू करत आहे.(service)राज्य सरका अॅपवर आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी अॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित राहणार नाहीये. सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या ॲप ला जय महाराष्ट्र, महा – राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देण्यात येईल. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिलीय.

सरकार वाहनसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे पाठवण्यात आलाय. त्यांच्या मंजुरीनंतर हे अॅप लवकरच कार्यान्वित करण्यात येईल असा विश्वास सरनाईकांनी व्यक्त केलाय. या उपक्रमाअंतर्गत अॅप विकसित करण्यासाठी ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी’ आणि ‘मित्र’ या संस्थेसह खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू करण्यात आलीय.(service)या योजनेच्या माध्यामातून मराठी तरुण-तरुणींना विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून वाहन खरेदीसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार असल्याची माहिती मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिलीय. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी या संस्थांतर्फे ११ टक्के व्याज परतावा अनुदानाच्या स्वरूपात दिले जाणार आहे.

दरम्यान खासगी संस्था अनाधिकृत ॲपच्या माध्यमातून प्रचंड नफा कमवतात. त्यासाठी कंपन्या चालक व प्रवासी यांची लूट करत आहेत. सरकारकडे यंत्रणा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असल्याने शासनाने असे ॲप विकसित केले तर त्याचा फायदा प्रवाशांच्या बरोबर चालकांना देखील होणार आहे. (service)या संदर्भात ५ ऑगस्ट रोजी मंत्रालयात संबंधितांची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर या ॲप निर्मितीचे तंत्रज्ञ व शासकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा :
रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…
जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा