खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या शिफ्टचा कालावधी ८ तासांचा असतो.(employees) त्यामुळे कर्मचाऱ्यांना ८ तास काम करणे अनिवार्य आहे. मात्र, आता तेलगंणा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारने कमर्शियल ठिकाणी म्हणजे व्यावसायिक युनिट्ससाठी १० तास काम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचसोबत पूर्ण आठवड्यात ४८ तास काम करण्याची लिमिट सेट केली आहे. सरकारने यासंदर्भात ५ जुलै रोजी आदेश जारी केले आहेत.

आता कर्मचाऱ्यांना दिवसाला १० तास काम करावे लागणार आहे आणि आठवड्याभरात कामाचे ४८ तास भरावे लागणार आहे. दुकाने आणि मॉल्ससाठीचे नियम वेगळे आहेत.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, तेलंगणा सरकारने राज्यातील कामकाज(employees) अधिक सोपे व्हावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. श्रम, रोजगार, प्रशिक्षण आणि कारखाना विभागाद्वारे हा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार, तेलंगणा दुकाने आणि आस्थापना कायदा, १९८८ अंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत. यानुसार, व्यावसायिक क्षेत्रातील कामाचे तास १० तासांपेक्षा जास्त नसावेत आणि आठवड्यांच्या तासांची मर्यादा ४८ तास असावी. याचसोबत यापेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला जाईल.
तेलंगणा सरकारच्या नियमांनुसार, जर १० तासांपेक्षा जास्त काम केले तर ओव्हरटाइम मिळणार आहे. ओव्हटाइम पकडूनदेखील कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. याचसोबत(employees) दर ६ तासांनी कर्मचाऱ्यांना ३० मिनिटांचा ब्रेक देणे आवश्यक आहे. या आदेश ८ जुलैपासून लागू करण्यात येईल.
सरकारच्या मते, आठवड्यातून कामाच्या वेळेबाबतचा हा नवीन नियम राज्यात व्यवसायाला चालना देईल. याअंतर्गत आठवड्यात ४८ तासांपेक्षा जास्त काम करण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी ओव्हरटाइम लावला जाणार आहे. परंतु त्यांना तीन महिन्यात १४४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागणार नाही, असंही सांगण्यात येत आले. या अटींचे पालन केले नाही तर कंपनीला दिलेली सूट रद्द केली जाईल.
हेही वाचा :
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मोदी सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार
भारतीय महिला संघ तिसऱ्या T20 सामन्यात कोसळला! इंग्लडने 5 धावांनी मिळवला विजय