गोविंदाचं 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा गेल्या काही वर्षांपासून (affair)सिनेसृष्टीपासून दूर असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते सतत चर्चेत राहतात. सध्या त्यांच्या वैवाहिक नात्याबद्दल मोठा खुलासा होत असून, एका रिपोर्टनुसार ते पत्नी सुनीता यांच्यापासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहेत.

37 वर्षांनंतर विभक्त होण्याची शक्यता?
80 आणि 90 च्या दशकात गोविंदाने आपल्या अभिनय आणि नृत्याने संपूर्ण बॉलिवूडवर राज्य केले होते. आजही त्यांच्या स्टाइल आणि चार्मला चाहते मोठ्या प्रमाणात पसंती देतात. (affair)मात्र, Reddit वर समोर आलेल्या माहितीनुसार, 37 वर्षांच्या विवाहानंतर ते सुनीता यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेत आहेत. सुनीता यांनी दिले होते इशारे, शेड्यूल मॅच होत नसल्याने दोघे वेगळे?

30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी संबंध?
या दरम्यान, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीशी प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे ही अभिनेत्री 30 वर्षांची असून गोविंदा आणि तिच्यात तब्बल 31 वर्षांचे वयाचे अंतर आहे. मात्र, अद्याप त्या अभिनेत्रीचे नाव उघड झालेले नाही. गोविंदाचा कोणताही अधिकृत खुलासा नाही(affair) सध्याच्या घडामोडींवर गोविंदाने कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या अफवा कितपत सत्य आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.

हिंदी रशला दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता म्हणाल्या, “मी आधी खूप सुरक्षित होते, पण आता नाही. कारण 60 व्या वर्षानंतर लोक सठियायला लागतात. मला माहीत नाही की तो काय करत आहे.” 1987 मध्ये झाले होते लग्न, दोन मुलांचे पालकगोविंदाने 1987 मध्ये सुनीतासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या कुटुंबातील या वादामुळे चाहते आणि बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट