जळत्या चितेवरून जिवंत झाला आज्जा म्हणाला…; धडकी भरवणारा Video Viral

सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळू शकतात. इथे कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. इथे बऱ्याचदा अशा गोष्टी शेअर केल्या जातात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल आणि आताही इथे असेच काहीसे घडून आले आहे. व्हिडिओतील(video) दृश्ये थरारक आणि धक्कादायक असून ती तुम्हाला क्षणातच हादरवू शकतात.

वास्तविक, आपल्याकडे कुणाचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम कार्य केले जाते ज्यात व्यक्तीच्या देहाचे सर्व धार्मिक विधी करून मग त्याला चितेवर झोपवून अग्नी दिली जाते. असं केल्याने व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हटले जाते पण याच चितेवरून मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत होताना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, तुम्ही बरोबर ऐकले… सध्या याच निराळ्या घटनेचा व्हिडिओ(video) इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यात काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात अंतिम विधीचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून येते. चिंता जळत असून याच्या आजीबाजूला अनेक मंडळी जमा झालेली असतात. सर्वजण मृत व्यक्तीच्या शांतीसाठी शोक व्यक्त करत असतात पण तितक्यातच चितेवरून माणूस अचानक उठतो आणि पटकन तिथून बाहेर पडून निघून जातो. जमलेली सर्व लोक हा तमाशा खुल्या डोळ्यांनी पाहतात पण कुणाच्याही तोंडातून एक शब्दही फुटत नाही.

सर्वजण हे पाहून शॉक असतात की मेलेला व्यक्ती नक्की परत जिवंत झालाच कसा? हा चमत्कार फार दुर्मिळ आणि धक्का देणारा असल्याने अनेकजण आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये हे दृश्य कैद करतात. दरम्यान ही घटना कुठली, कधीची आहे आणि खरोखर हे सत्यात घडून आले आहे का… याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सॉरी आज नको’ असे लिहिले आहे.

हा धक्कादायक व्हिडिओ @sorry.sirji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ आपली ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करायला विसरला असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात बेस्ट कमबॅक” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यमराजकडून ९९ मिसकॉल्स आले आहेत”.

हेही वाचा :

सतत पोटोत दुखतंय? होऊ शकतात हे गंभीर आजार

तारदाळ आणि खोतवाडीतील जलजीवन योजनेतील अपूर्ण कामांवरून विनोद कोराणे यांचे बेमुदत उपोषण सुरू

आता बाप्पाची आरती कोण करणार? महादेवी हत्तीचा व्हिडिओ व्हायरल… महादेवीच्या विरहाने व्याकूळ नांदणी