संसदेच्या पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी राज्यसभेतील(political updates) विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी केली. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी विधेयक मांडण्याची विनंती केली.

राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला (political updates)पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्याची मागणी यापूर्वीही केली. आता त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात विधेयक आणण्याची विनंती केली. त्यांनी पत्रात म्हटलं की, गेल्या पाच वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांनी पूर्ण राज्यत्व बहाल करण्याची करत आहेत. त्यांची मागणीही वैध आहे. आणि ती त्यांच्या संवैधानिक आणि लोकशाही अधिकारांवर आधारित आहे.
या पत्रात पुढं पत्रात लिहिलं की, केंद्रशासित प्रदेशांना राज्याचा दर्जा दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु जम्मू आणि काश्मीरचे प्रकरण असं आहे की, स्वतंत्र भारतात असे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. फाळणीनंतर पूर्ण राज्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे लोकशाही अधिकारांचे उल्लंघन आहे.

पत्रात दोन्ही काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या सरकारच्या वचनाची आठवण करून दिली. त्यांनी लिहिले आहे की १९ मे २०२४ रोजी भुवनेश्वर येथे दिलेल्या मुलाखतीत तुम्ही म्हटले होते की,
राज्याचा दर्जा पुनर्संचयित करू.त्यानंतर १९ सप्टेंबर २०२४ रोजी, श्रीनगरमधील एका सभेला संबोधित करताना, मोदींनी पुन्हा याचा पुनरुच्चार केला होता. तसेच राहुल गांधींनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यासाठी विधेयक आणण्याची मागणीही पत्रात केली.
हेही वाचा :
सांगलीचा रँचो! दहावीच्या मुलाने बनवली “ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’
एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती
मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ