शुक्रवारी बाजारात जोरदार वाढ झाल्यानंतर प्रॉफिट बुकींग(stocks today) दिसून आले. त्यामुळे बाजार वरच्या स्तरावरून घसरला आणि बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सवरही दबाव दिसून आला. इन्फ्रा, रियल्टी, ऑईल आणि गॅस शेअर्समध्ये विक्री झाली.
आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्सवरही(stocks today) दबाव दिसला. पण पीएसई आणि फार्मा इंडेक्स वाढीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 733 अंकांनी घसरला आणि 73,878 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 172 अंकांनी घसरून 22,476 वर बंद झाला. तर बँक निफ्टी 308 अंकांनी घसरून 48,924 वर बंद झाला. मिडकॅप 180 अंकांनी घसरून 50,935 वर बंद झाला.
बाजारात पुन्हा एकदा प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत असल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. शुक्रवारचा दिवस बाजारात जवळपास एक टक्का घसरणीने संपला. भक्कम जागतिक संकेतांच्या आधारे सकारात्मक सुरुवात करूनही, आघाडीच्या शेअर्समध्ये प्रॉफीट बुकिंग झाल्यामुळे बाजारातील सुरुवातीचा नफा गमावला आणि निफ्टी लाल रंगात गेला.
शेवटी निफ्टी 0.85 टक्क्यांच्या घसरणीसह 22,456.65 अंकांच्या आसपास बंद झाला. ऑटो, आयटी आणि रियल्टी या मोठ्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका बसला. याशिवाय ब्रॉडर इंडेक्समध्येही सुमारे 0.50 टक्क्यांची घसरण दिसून आली.
इंडेक्समध्ये झालेल्या तीव्र घसरणीने गेल्या चार सत्रांतील नफ्यावर परिणाम झाला. निफ्टीने त्याच्या शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच 20 डीईएमएचा सपोर्ट राखण्यात यश मिळवले. अशा परिस्थितीत, निवडक शेअर्सचा विचार करा असा सल्ला त्यांनी दिला.
जर निफ्टी 22,400 चा सपोर्ट राखण्यात अपयशी ठरला तर हेजिंग धोरण स्वीकारले पाहिजे. देशांतर्गत कारणांव्यतिरिक्त, ट्रेडर्सनी अमेरिकन बाजारांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?
- एल अँड टी (LT)
- मारुती (MARUTI)
- नेसले इंडिया (NESTLEIND)
- रिलायन्स (RELIANCE)
- भारती एअरटेल (BHARTIARTL)
- कोफोर्ज (COFORGE)
- एमआरएफ (MRF)
- भारतफोर्ज (BHARATFORG)
- एम फॅसिस (MPHASIS)
- फेडरल बँक (FEDERALBNK)
नोंद – म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
हेही वाचा :
धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये……
आजचे राशी भविष्य (06-05-2024) : astrology reading
इचलकरंजी येथील खोतवाडी तारदाळ रोडवर अपघात; दोघे गंभीर जखमी