एखाद्या पात्रात समरसून जाण्यासाठी कलाकार काहीही करायला तयार असतात. आताच्या काळात इतक्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत की एखाद्याचा संपूर्ण लूक अगदी सहज बदलता येतो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका सुपरहिट अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचा भयंकर(look) लूक पाहायला मिळतोय. ही अभिनेत्री आहे नीना गुप्ता.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्ताच्या अभिनयाबद्दल आणि कामाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्या नेहमीच चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतात. यावेळी त्या अशा एका भयंकर प्रोजेक्टमधून प्रेक्षकांना भेटीस येत आहे जो पाहून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच ४४० व्होल्टचा धक्का बसेल. नीना गुप्तांच्या आगामी प्रोजेक्टमधील लेटेस्ट(look) लूक सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यात त्या ‘गंजी चुडैल’च्या लूकमध्ये दिसत आहे. त्यांचीही अजब स्टाईल पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
नीना गुप्ता यांच्या यूट्यूब इंडिया इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ६५ वर्षांच्या नीना गुप्ता यांच्यासोबत ब्युटी आणि लाइफस्टाइळ शिवशक्ती सचदेव, इशिता मंगल आणि शक्ती सिधवानी दिसत आहेत. या तिघांचा एक मजेशीर व्हिडिओ आहे.
व्हॉईस ओव्हरने व्हिडिओची सुरुवात होते, ‘एकदा तीन YouTubers चे अपहरण झाले होते. गंजी चुडैलने त्यांचे अपहरण केलेल. मग नीना गुप्तांची एण्ट्री होते. या लूकमध्ये त्यांना ओळखता येत नाही. त्या म्हणतात, ‘मी मीम्स बनवून कंटाळले आहे. आता तुम्ही तिघेही मला बेब बनवाल. यानंतर तिघेही नीना गुप्ताचा मेकअप करतात.
हा व्हिडिओ शेअर करताना यूट्यूबने लिहिले आहे की, ‘भूत आयकॉनिकपासून युथ आयकॉनिकपर्यंत. ही जेन झीची चुडैल आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सेलेब्स आणि चाहत्यांकडून कमेंट्स येत आहेत. नीना यांना पाहून सर्वांनाच धक्का बसला. नीना गुप्ता यांचा हा प्रमोशन व्हिडिओ असू शकतो असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. पण त्यांनी अद्याप या गोष्टीबद्दल काहीच सांगितलेले नाही.
नीना गुप्ता यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना ३ राष्ट्रीय पुरस्कार, १ फिल्मफेअर आणि २ फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार यांनी गौरवण्यात आले आहे. त्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या वेगळ्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली आहेत. नुकत्याच त्या मल्याळम वेब सीरिज १००० बेबीजमध्ये दिसल्या होत्या.
हेही वाचा :
बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर …Video Viral
लग्नाहून घरी जाताना कारची तरुणीला जोरदार धडक; धडकी भरवणारी घटना Viral Video
ईव्हीएम जबाबदार नाही? आता वाढीव मतांवर संशय; काँग्रेसचा नेत्यांवर ठपका!