टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय संघ(Team India) ४ जुलै रोजी भारतात दाखल झाला आहे. भारतीय संघ वर्ल्डकप जिंकून भारतात आल्यानंतर क्रिकेट फॅन्स जोरदार जल्लोष करताना दिसून आले आहेत. सकाळी ६ वाजता एअर इंडियाच्या स्पेशल चार्टर्ड विमानाने भारतीय संघ दिल्लीत दाखल झाला. त्यानंतर सर्व खेळाडू दिल्लीतील ICT Maurya हॉटेलमध्ये जाण्यासाठी रवाना झाले. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर खेळाडूंचं जोरदार स्वागत झालं. दरम्यान सूर्यकुमार यादवचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवने भारतीय संघाच्या(Team India) विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला फायनलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नसली तरीदेखील त्याने फायनलमध्ये टिपलेला झेल हा सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. सूर्यकुमार यादवने मोक्याच्या क्षणी डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं.
भारतीय संघाच्या २ बस ICT Maurya हॉटेलमध्ये दाखल झाल्या त्यावेळी संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील खेळाडू हॉटेलमध्ये जात असताना, खेळाडू आणि फॅन्स डान्स करताना दिसून आले. सूर्यकुमार यादवने फॅन्ससोबत ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला. त्याचा भांगडा करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीाडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
रोहितनंतर सूर्याही मागे राहिला नाही. त्यानेही या तालावर भांगडा करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे या व्हिडीओमध्ये ऋषभ पंतच्या हातात ट्रॉफी आहे आणि त्याने देखील हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ठेका धरला.
बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ सकाळी दिल्लीत पोहोचला आहे. यानंतर सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. दुसरीकडे पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होणार आहे. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे.
हेही वाचा :
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?
कोटीच्या दागिन्यांची चोरी टीप दिल्यानेच “सॅक” लंपास
कोल्हापुरात खुलेआम वेश्याव्यवसाय; मुख्यमंत्र्यांची शिवसेना आक्रमक