कीमोथेरेपी सुरु असताना परत आले केस! कॅन्सरग्रस्त हिना खानचा आनंद गगनात मावेना

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खानच्या कॅन्सर (chemotherapy)विषयी सगळ्यांना माहित आहे. सध्या हिना खान ही कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्याचा सामना करत आहे. त्यामुळे हिना ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आता आनंद शोधताना दिसते. नुकतंच हिनानं चाहत्यांना सांगितलं की तिचे केस आता परत आले आहेत. कीमोथेरेपी सुरु असताना असा चमत्कार कसा झाला असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्याचा खुलासा देखील तिनं केला आहे.

हिना खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ(chemotherapy) शेअर केला आहे. या रील व्हिडीओत हिना तिचे केस दाखवताना दिसते. मात्र, हे तिचे खरे केस नाहीत तर ते खोटे आहे. हे केस टोपीला जोडलेले आहेत. या व्हिडीओत हिना सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर केस असलेली ती टोपी दाखवते आणि त्यानंतर ती स्वत: ती टोपी घालून कॅमेऱ्यासमोर येते. दरम्यान, हे तिचे खरे केस असल्याचे हिनानं सांगितलं. जे तिनं काही दिवसांपूर्वी कापले होते.

हा व्हिडीओ शेअर करत हिना खाननं कॅप्शन दिलं की “जेव्हा मला कळलं की काही काळानंतर माझे केस गळू लागतील किंवा केस गळती सुरु होईल. तर मी त्याच वेळी जेव्हा माझे केस लांब आणि सुंदर दिसत होते तेव्हाच मी माझ्या हिशोबानं कापण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या स्वत: च्या केसांची एक वीग बनवण्याचा निर्णय घेतला. जे मला या कठीण काळात थोडा आधार देतील.

मी असं म्हणायला हवं की हा एक योग्य निर्णय होता आणि मला त्यावर खूप गर्व आहे. ज्या महिला या संघर्षातून जातात त्या सगळ्या सशक्त महिलाना एक विशेष संदेश द्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या निर्णयाशी सहमत आहात. तर मी हे सुचवेन की तुम्ही देखील असचं करा. यामुळे कमीत कमी काही गोष्टी सोप्या होती. यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.”

हिनानं पुढे लिहिलं की “हे घातल्यावर असं वाटतं की जनू काही मला माझे हरवलेले केस परत मिळाले आहेत. हे खूप चांगल आणि आरामदायक वाटतं. हा फक्त एक छोटासा काळ असतो आणि यातून जावं लागेल हे मला माहित होतं. त्यामुळे यात कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मी त्याला सामान्य करण्याचा निर्णय घेतला. आता मी त्याचा वापर करत आहे, मला वाटलं की ही एक चांगली गोष्ट आहे जी तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी, कारण तुम्ही लोक एका स्वप्नासारखे आहात.. मी कुठेही जातो, जेव्हाही मी बाहेर पडते तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया हृदयाला भिडतात आणि उत्साह आणखी वाढतो.”

सगळ्यात शेवटी हिना खान म्हणाली, “जेव्हा कोणी अनोळखी (chemotherapy) व्यक्ती ही लवकरात लवकर स्वस्थ व्हावं यासाठी प्रार्थना करतात तेव्हा माझ्या डोळ्यात ते दिसून येतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाहणं खूप वेगळंच असतं की तुमच्याकडून मिळालेल्या सकारात्मकतेसाठी मी आभारी आहे. मला माहित आहे की संपूर्ण जग माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. पण तरी देखील माझ्यासाठी प्रार्थना करा.”

हेही वाचा :

“नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाचे धमाकेदार टीजर झाले लाँच!

इचलकरंजीतील जादूप्रेमी रसिकांसाठी जादूचे प्रयोग बघण्याची सुवर्णसंधी…..

आईच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने कोल्हापुरात उच्चशिक्षित सख्ख्या बहिण भावाने घेतली राजाराम तलावात उडी