मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. राज्यात १ जानेवारीपासून केशकर्तनालयाच्या(Haircut) सेवा महागल्या आहेत. सलून चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतल्याने आता केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी खिशाला मोठी झळ बसणार आहे.
सलूनमध्ये(Haircut) वापरल्या जाणाऱ्या क्रीम्स, हेअर डाय आणि इतर सौंदर्यप्रसाधनांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर कारागिरांचे वेतन आणि जागेचे भाडेही वाढले आहे. या वाढत्या खर्चामुळे नाईलाजाने दरवाढ करावी लागल्याचे स्पष्टीकरण सलून मालकांनी दिले आहे.
आजकाल वेगवेगळे हेअर स्टाइल करण्याचा ट्रेंड आहे. अगदी घरगुती समारंभापासून ते कार्यालयातील कार्यक्रमांपर्यंत, हेअर स्टाइल आणि हेअर कलर करण्याला प्राधान्य दिले जाते. पण या सेवा आधीपासूनच महाग आहेत. युनिसेक्स सलूनमध्ये तर हे दर आधीच गगनाला भिडलेले आहेत. त्यात आता या नवीन दरवाढीची भर पडली आहे.
या दरवाढीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. नवीन चित्रपट किंवा मालिकेमुळे एखादी हेअर स्टाइल लोकप्रिय होते आणि विद्यार्थी त्याचा अवलंब करतात. मात्र, त्यासाठी खिसा रिकामा करावा लागतो.
आता तर ही दरवाढ म्हणजे ‘आगीतून फुफाट्यात’ अशी अवस्था झाली आहे. या दरवाढीमुळे हेअर स्टाइल करायची की पैसे वाचवायचे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. “आता केस कापायचे की नाही असा प्रश्न पडला आहे. महागाईमुळे आधीच बजेट कोलमडले आहे, त्यात आता या दरवाढीची भर पडली आहे,” अशी प्रतिक्रिया दादर येथील विद्यार्थी निखिल सुरवसे याने दिली.
नवीन दरपत्रक-
दाढी- जुने दर-७० ते १००, नवे दर- १०० ते १५०
कटिंग- जुने दर-१५०, नवे दर- २००
कलर- जुने दर-४००, नवे दर- ५००
फेशियल- जुने दर-५००, नवे दर ७००
या दरवाढीमुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली असून, महागाईचा फटका आता सौंदर्य आणि केशकर्तनालयापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा :
‘फटके बसले असतील, म्हणून…’ राऊतांच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
कमीत कमी 7500 रूपये पेन्शनसह महागाई भत्ता, बजेटची झोळी उघडणार का निर्मला सीतारमण
धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान