लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव वगळलयं का? अशाप्रकारे तपासा

राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या लाडकी (Beloved)बहीण योजनेत मोठे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. तब्बल 14 हजार पुरुषांनी या योजनेचा गैरवापर करत लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. यासोबतच 65 वर्षांवरील महिला आणि सरकारी कर्मचारी महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे शासनाने स्क्रुटिनी पुन्हा सुरू केली असून, लाभार्थ्यांची नवी यादी तयार केली जात आहे.

या स्क्रुटिनीच्या प्रक्रियेमुळे काही योग्य पात्र महिलांची नावं देखील यादीतून वगळली गेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, तुमचं नाव यादीत आहे की नाही, हे त्वरीत तपासणं गरजेचं ठरतंय. शासनाच्या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली असून, तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल, तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

लाडकी(Beloved) बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगइन करा. त्यानंतर आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून लाभार्थी यादी किंवा अर्ज स्थिती पाहण्याचा पर्याय निवडा. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासा.

जर तुमचं नाव यादीत असेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. पण नाव नसेल तर तुम्ही वॉर्ड ऑफिस, ग्रामपंचायत किंवा महा-ई सेवा केंद्रात जाऊन रीतसर तक्रार दाखल करू शकता. यासाठी संबंधित कागदपत्रांची छाननी केली जाईल आणि तक्रारीची दखल घेऊन निर्णय घेतला जाईल.

शासनाने आयकर विभागाच्या मदतीने नियमबाह्य लाभार्थ्यांची माहिती मागवली आहे. यामध्ये आर्थिक परिस्थिती, नोकरीची माहिती, वय व इतर निकष तपासले जात आहेत. यामुळे ज्या महिलांनी चुकीचा लाभ घेतला आहे, त्यांची नावं थेट यादीतून वगळण्यात आली आहेत.

मात्र, काही योग्य पात्र महिलांची नावं देखील चुकीच्या वर्गवारीमुळे हटवली गेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नियम पाळून अर्ज केला असेल आणि तरीही तुमचं नाव यादीत नसेल, तर तातडीने यंत्रणेशी संपर्क करून योग्य ती कारवाई मागणं आवश्यक आहे.

हेही वाचा :

अखेर तो क्षण आलाच, ‘ठरलं तर मग’मधील विलास मर्डर केसचा निकाल जाहीर; बंद होणार मालिका?
इंग्लंडच्या हुकमी एक्क्याला दुखापत, सामना सोडून मैदानाबाहेर; ओव्हलच्या मैदानात काय घडलं?
वडील बिझनेसमन, आई टीचर, ‘या’ अभिनेत्रीनं सलमान खानच्या सल्ल्यानं बदललेलं आपलं नाव; आज बॉलिवूडची टॉप अभिनेत्री